Pune Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुणे हादरले! मध्यरात्री हत्येचा थरार, डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या

Pune Police: पुण्यामध्ये तरुणाची मित्रांनी हत्या केली. किरकोळ वादातून ही घटना घडली. वाघोलीमध्ये मध्यरात्री हत्याकांडाची ही घटना घडली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. तिघांनी हे कृत्य केले.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये हत्याकांडाची भयंकर घटना समोर आली आहे. एका तरुणाला डोक्यामध्ये दगड घालून जागीच संपवण्यात आले. तिघांनी या तरुणाची हत्या केली. पुण्यातल्या वाघोली परिसरात ही घटना घडली. मित्रांनीच या तरुणाची हत्या केली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून ही भयंकर घटना घडली. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या वाघोली परिसरामध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली. डोक्यामध्ये दगड घालून या तरुणाला संपवण्यात आले. रेकॉर्डवरील आरोपीची त्याच्याच तीन साथीदारांनी हत्या केली. बादल शेख (वय २४, राहणार- खराडी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील वाघोली भागात असलेल्या उबाळेनगर परिसरात कृष्णा लॉज समोर मध्यरात्री ३.३० वाजता ही घटना घडली.

बादल शेखची हत्या करणारे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी रात्री खराडी परिसरात या सगळ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्यातून त्यांच्यात जोरदार भांडण झाले. याच भागात असलेल्या एका लॉज येथे यातील एक जण आला. तिथे रूमची चौकशी केली. यावेळी पुन्हा त्यांच्यात भांडण झाले.

या वादामध्ये संतप्त झालेल्या तिघांनी बादल शेखवर आधी धारधार शस्त्राने वार केले. त्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याला जागीच संपवलं. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बादलचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत बादलचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karmala Fort History: मुंबईच्या समुद्रकिनारी असलेले जुने गड, करमाळा किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

'जरांगेंना AK47 द्या आणि ओबीसींचा खात्मा करा' विजय वडेट्टीवार संतापले

मित्रांसोबत नदीवर पोहायला गेला, उपसरपंचाचा मुलगा पाण्यात वाहून गेला, २३ वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू

Nagpur Health Crisis : विषारी औषध की मेंदूज्वर? नागपूर आणि मध्यप्रदेशातील बाल मृत्यूमागचं नेमकं कारण आलं समोर

Soft Chapati Tips: पहिल्यांदा चपाती करताय? मग सॉफ्ट चपातीसाठी ही टिप नक्की वापरुन पाहा

SCROLL FOR NEXT