Nashik Crime News: हात पिरगळला,पाठीवर बुक्क्यांचा मारा, नाशिकमध्ये भररस्त्यावर पत्नीला बेदम मारहाण, संतापजनक घटना कॅमेऱ्यात कैद

Husband Brutally Assaults Wife On Busy Road In Nashik: नाशिक शहरातील पंचवटी परिसरात भररस्त्यात पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.
Shocking visuals from Nashik: Husband mercilessly assaulting his wife on a busy road as bystanders watch silently
Shocking visuals from Nashik: Husband mercilessly assaulting his wife on a busy road as bystanders watch silentlySaam Tv
Published On

नाशिक शहरात भर रस्त्यात खून, गाड्या फोडणे, अंमली पदार्थ तर चौकाचौकात विकणे हे सगळे सुरू असल्याने शहरातील नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. या सगळ्याल आळा घालण्यासाठी शहरातील भाजपच्या आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान गाठले. मात्र, तरी देखील शहरातील गुन्हेगारी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीये. अशातच काल दिनांक 3 शुक्रवारी पंचवटी कारंजा परिसरात वर्दळीच्या भर रस्त्यात एक तरुण त्याच्या पत्नीला बेदम मारहाण करत असताना ये जा करणारे फक्त पाहत होते.

सहा ते सात मिनिटे ही महिला जबर मार खात असताना त्या तरूणास रोखण्यासाठी एकही व्यक्ति पुढे आली नाही. एक महिला तर बाजूला असून फक्त बघ्याची भूमिका घेत होती.सोशल मीडियावर भरस्त्यात मारहाण होत असतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच पंचवटी पोलिसांनी या तरुणाचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. पीडित महिलेकडून तक्रार घेऊन तिच्या पतिविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी सांगितले.

Shocking visuals from Nashik: Husband mercilessly assaulting his wife on a busy road as bystanders watch silently
Cyber Fraud : सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात पोलीसच अडकला, लिंकवर क्लिक केलं अन्....

कौटुंबिक कारणावरून हा पती पत्नीचा वाद झाल्याने पत्नीला मारहाण झाल्याचे प्राथमिक पोलीस तपासातून समोर आले. या तरुणाने त्याच्या पत्नीचे केस आणि हात धरून इतके मारले की थेट जमिनीवर पडली.अशा निर्दयींना कडक शासन झाले पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी या व्हिडिओवर दिली आहे.

Shocking visuals from Nashik: Husband mercilessly assaulting his wife on a busy road as bystanders watch silently
Crime News: महिला शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार, जिम ट्रेनरसह चार मित्रांचं भयानक कृत्य

कुंभमेळानगरी की गुन्हेगारांचीनगरी?

नाशिकची ओळख ही कुंभमेळानगरी म्हणून आख्या देशभर प्रचलित आहे. पुढील दोन वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा होणार असून प्रशासन पातळीवर कोट्यावधी खर्च करून विकासाच्या गप्पा मारता आहेत. मात्र हा कुंभमेळा कितपत सुरक्षित होणार यावर कुठलेही ठोस पाऊले उचलली जात नाहीये. दररोज होणाऱ्या खुणांच्या घटणामुळे शहरवासी हे भयभीत झाले आहे.

मंत्री दादा भुसे यांनी देखील यावर नाराजी व्यक्त करत पोलिस आयुक्तांची चर्चा केली आणि त्यानंतर भाजपच्या तीन आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नाशिकमधील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी निवेदन देण्यात आले. यानंतर काल शहरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. आता यानंतर देखील तरी शहरातील गुन्हेगारीला आळा बसणार का? हे पाहण महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com