Pune Crime News Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime news: पुण्यात कोयता गँगचा पुन्हा धुमाकूळ! क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना धमकावले; कारसह दुचाकीची तोडफोड

Koyata Gang Crime: चार ते पाच जणांच्या टोळक्याने मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हातात कोयते घेत प्रचंड दहशत माजवली.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Crime: पुणे शहरातील कोयता गँगच्या विरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. कोयता गँगच्या म्होरक्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र असे असले तरी पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ अद्याप सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या शहरातील कोयता गँगचे नवीन प्रकरण समोर आले असून खेळणाऱ्या मुलांना धमकावण्यात आल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात कोयता गँगचा (Koyata Gang) पुन्हा धुमाकूळ घातला आहे. कारसह दुचाकी वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कोयता गँगने केला आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्याने मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हातात कोयते घेत प्रचंड दहशत माजवली.

इतकेच नव्हेतर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना धमकावत त्यांच्या दुचाकी आणि चार चाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकार बिबवेवाडीतील संत निरंकारी सत्संग भवनच्या समोर 24 मे च्या मध्यरात्री घडला असून यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.. (Latest Marathi News)

दरम्यान, याप्रकरणी बाळू बाबू पवार, अभि वाघमारे, विशाल उर्फ नकट्या पाटोळे, डुई त्याच्यासह आणखी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अंकित भैरू प्रसाद सैन यांनी तक्रार दिली आहे. मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.. (Pune News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Rules: घरात किती पेट्रोल साठवावे? नियम आताच घ्या जाणून, नाहीतर...

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने कांदा पिकाला फटका

Petrol-Diesel Crisis: पेट्रोल मिळत नसल्याने तरुणाची सटकली, थेट दुचाकीच पेटवून दिली; VIDEO व्हायरल

Thane Travel : एकाच दिवशी करा ३ किल्ल्यांचा रोमांचक ट्रेक, मुंबईजवळ आहे 'हे' खास लोकेशन

धाड धाड...! घरातून मध्यरात्री गोळीबाराचा मोठा आवाज आला; दरवाजा उघडल्यानंतर पुजाऱ्याच्या कुटुंबातील सर्वच हादरले

SCROLL FOR NEXT