Pune Baramati Crime Saam Tv
मुंबई/पुणे

संतापजनक! पत्नीला मित्रासोबत शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

पीडित महिलेच्या पतीसह आरोपी माळशिकारे याला सुद्धा अटक करण्यात आली

साम टिव्ही ब्युरो

पुणे : राज्यात एकीकडे महिला अत्याचाराच्या (Crime) घटना वाढत असतानाच, पुणे जिल्ह्यातून (Pune) एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका नराधम पतीने आपल्या मित्रालाच पत्नीवर बलात्कार करायला लावला. ही संतापजनक घटना बारामती (Baramati) तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी पीडित महिलेनं दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला. (Pune Crime News)

शेखर (ता. बारामती) असं आरोपी मित्राचं नाव आहे. त्याच्यासोबत पीडित महिलेच्या पतीवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेखर हा पीडित महिलेच्या पतीसोबत तिच्या घरी आला होता. यावेळी दोघांनीही मद्यप्राशन करून जेवण केलं. त्यानंतर पीडितेच्या पतीने शेखर याच्यासोबत पत्नीला शारिरीक संबध प्रस्तापित करण्यास भाग पाडले.

रात्री उशिरा संबंधित महिलेच्या पतीने आपल्या मित्राला या पत्नीवर अत्याचार करायला लावला. संताजनक बाब म्हणजे जेव्हा आरोपी शेखर हा पीडित महिलेवर बलात्कार करत होता. तेव्हा महिलेचा पतीही त्याला हे घृणास्पद कृत्य प्रवृत्त करत होता. दरम्यान, पीडितेने अत्याचार होत असताना विरोध केल्याने आरोपी शेखर आणि तिच्या पतीने पीडितेला मारहाण सुद्धा केली. (Baramati Crime News)

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर पीडितेने सोमवारी सकाळी बारामती पोलीस ठाणे गाठत तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची पोलिसांसमोर आपबीती सांगितली. पीडितेची कहाणी ऐकूण पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीडित महिलेच्या पतीसह आरोपी माळशिकारे याला सुद्धा अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर स्कूल बसमध्ये बिघाड

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

SCROLL FOR NEXT