pune crime fake journalists blackmail salon owners Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime : पत्रकार असल्याची बतावणी करत सलून मालकांना ब्लॅकमेल, पुण्यातील मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पिता-पुत्राचा कांड

Pune Spa Center Sex Racket : सिराज चौधरी (वय ५५) आणि त्याचा मुलगा वसीम हे स्थानिक भाषेतील वृत्तपत्र चालवतात आणि लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्याचा वापर करतात.

Prashant Patil

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे : पत्रकार असल्याचा दावा करणारे वडील आणि मुलगा शहरात सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे. सोमवारी पुणे पोलिसांनी बाणेर येथील आलिशान २४ थाई स्पावर छापा टाकला तेव्हा हे उघड झालं. सिराज चौधरी (वय ५५) आणि त्याचा मुलगा वसीम हे स्थानिक भाषेतील वृत्तपत्र चालवतात आणि लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्याचा वापर करतात. या प्रकरणात पोलिसांनी वसीम आणि एका महिलेसह इतर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. वसीमकडे २४ थाई स्पा असलेल्या मालमत्तेची मालकी आहे.

सिराजला ठाणे पोलिसांनी एका पार्टीमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. दुसरीकडे, वसीम पत्रकाराच्या नावाखाली इतर स्पा आणि ब्युटी सलूनना भेट देतो आणि स्पाय कॅमेऱ्यानं व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यांच्या मालकांना ब्लॅकमेल करतो. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलिसांनी सोमवारी रात्री कारवाई करत २४ थाई स्पामधून दोन महिलांची सुटका केली. महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. बाणेर पोलिसांनी रात्री ८ वाजेच्या सुमारास या स्पावर छापा टाकला. हा स्पा टाउन बिल्डिंगमध्ये आहे.

नागालँडची राहणारी ज्योती देवी (वय ३८), जबलपूरची रहिवासी अमनगिरी गोसवानी (वय २३), स्पा ऑपरेटर दीपक चव्हाण आणि वसीम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिताच्या कलम १४३, ३(५) आणि अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून गेवराई नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Mahabharat: महाभारताचे पुरावे सापडले? कुरुक्षेत्रात सापडला रथ, महाकाय गदा?

Maharashtra Politics: सुजय विखेंनी दिले वडिलांना राजकारणाचे धडे,'विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्यांपासून सावध राहा'

Buldhana Crime: सकाळी-सकाळी डोकं फिरलं, सपासप कुऱ्हाडीने वार करत आई-बाबाला संपवलं; नंतर स्वतःला लावला फास

SCROLL FOR NEXT