Pune Crime Saam Digital
मुंबई/पुणे

Pune Crime : ड्रग्स, कोयते गँग, हिट अॅण्ड रन; पुणे बनलंय क्राईम कॅपिटल

Pune Crime Update : विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात आता, ड्रग्ज, कोयते गँंगने धुमाकूळ घातला आहे. तर हिट अॅण्ड रण आणि अत्याराच्या घटनांना शहर हादरून गेलं आहे.

Snehil Shivaji

विद्येचं माहेरघर पुणे.. राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे.. परंतू याच पुण्याचं सध्या मिर्झापूर होतंय. होय तुम्ही जे ऐकताय ते खरंय.. का पुण्याचं मिर्झापूर होतंय. पहा, या रिपोर्ट मध्ये.

पुणे !!! राज्याची सांस्कृतिक राजधानी परंतू आणि आज शरमेनं मान खाली जावी अशी या राजधानीची अवस्था. हि जी स्कूल व्हॅन तुम्ही पाहताय त्याच स्कूल व्हॅन मध्ये शाळेत जाऊन उज्वल भविष्याचे धडे गिरवणाऱ्या २ चिमुरड्यांच्या भविष्याला चिरडण्यात आलं. याच स्कूल व्हॅन मध्ये एक नव्हे तर २ चिमुरड्यांवर अत्याचार झाला. अत्याचार करणारा याच स्कूल व्हॅनचा चालक. हे कमी की काय म्हणून बोपदेव घाटात एका युवतीवर 3 नराधमांनी पाशवी बलात्कार केला. मित्रांसोबत फिरायला आलेल्या या युवतीवर मित्राच्या डोळ्यांदेखत अत्याचार करुन आरोपी पसार झाले. पोलिसांची लख्तर वेशीला टांगत आरोपी अजूनही मोकाट आहेत.

कोयता गँगचा उच्छाद

नाना पेठ

2 सप्टेंबर

माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर भर रस्त्यात गोळीबार.. गोळीबारनंतर आंदेकरांवर कोयत्यानं वार.. हल्ल्यात आंदेकरांचा जागीच मृत्यू झाला.

ससाणेनगर

26 ऑगस्ट

पोलिस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला, भांडण सोडवायला गेलेले पोलिस निरीक्षक रत्नगिप गायकवाड कोयता हल्ल्यात गंभीर जखमी

(पौड)

29 सप्टेंबर

सुसगावात अभियंत्यावर 30 ते 40 जणांचा काठ्या, रॉड, दगडांनी हल्ला . हल्ल्या वेळी कारमध्ये त्यांचे कुटुंबीय असतांनाही जिवघेणा हल्ला..

(हडपसर)

हडपसरच्या फुरसुंगी परिसरात अनेक दुकानांची तोडफोड.. रस्त्यावरील वाहनांच्या फोडल्या काचा.. आरोपींमध्ये अल्पवयीन आरोपी..

कोंढवा

दुसरीकडे पुण्याच्या मोहम्मदवाडी परिसरात तिघांचा पानटपरीवाल्यावर हल्ला..

हल्ल्यात टपरीचालक गंभीर जखमी..

लोहगाव

लोहगाव परिसरातही कोयता गँगची दहशत पहायला मिळतेय. कोयता भिरकवत 'आम्ही इथले भाई' असं म्हणत दहशत निर्माण करण्यात आली आहे. चनाराम चौधरी यांच्या दुकानाची तोडफोड केली आहे.

पुण्यातील पोर्श कार हिट अँण्ड रन प्रकरण तर आपल्या सगळ्यांना माहितीचं आहे. एका बड्या बापाच्या पोरानं दोघांना चिरडूनही त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांपासून, पोलिस आणि राजकारण्यांचा प्रयत्न आजही आठवला की आपल्या व्यवस्थेची लाज काढतो.पेशवाईच्या समृद्ध इतिहासानं पावन असलेल्या पुण्यात ड्रगिस्ट, रेपिस्ट आणि कोयते नाचवून मोगलाई आणणाऱ्या कारट्यांना वेळीच ठेचणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा पुण्याचा मिर्जापूर झाला तर नवल वाटायला नको.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

SCROLL FOR NEXT