Pune Cyber Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: शेअर मार्केटमुळे डॉक्टरला सव्वा कोटींचा गंडा, सायबर चोरट्यांनी असा साधला डाव

Pune Police: पुण्यातील सुशिक्षित डॉक्टर सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकला. या डॉक्टरला सायबर चोरट्यांनी तब्बल सव्वा कोटींचा गंडा घातला. नेमकं काय घडलं वाचा...

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये डॉक्टरला सायबर चोरट्यांनी गंडा घातलाय. शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून डॉक्टरची फसवणूक करण्यात आली आहे. डॉक्टरला तब्बल सव्वा कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी डॉक्टरने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्टरची तब्बल १ कोटी २२ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. सायबर चोरट्यांनी फिर्यादी डॉक्टरच्या मोबाईलवर मेसेज पाठवला होता. त्यांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यानंतर चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवले.

त्यानंतर सायबर चोरट्यांनी डॉक्टरला व्हॉटसॲप ग्रुपमध्ये सहभागी करून मोबाइलमध्ये ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. जास्त परतावा मिळेल या आशेने डॉक्टरने सायबर चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात पैसे जमा केले. चोरट्यांनी त्यांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर १० कोटी २६ लाख रुपये नफा मिळाल्याचे भासविले. डॉक्टरने ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना मिळालेल्या नफ्यावर ५ टक्के रक्कम भरावी लागेल तोपर्यंत ही रक्कम काढता येणार नसल्याचे चोरट्यांनी त्यांना सांगितले.

डॉक्टरला चोरट्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे डॉक्टरच्या लक्षात आले. त्यांनी थेट सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यावरून सायबर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध फसवणूक आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

SCROLL FOR NEXT