Pune Crime News Saamtv
मुंबई/पुणे

Shikrapur Crime News: पुणे- नगर महामार्गावर आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; परिसरात खळबळ

Pune Nagar Highway News: शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

रोहिदास गाडगे

Pune Crime News: पुणे नगर महामार्गावर शिक्रापुर जवळील सणसवाडी येथे एका अज्ञाताचा खून करून मृतदेह जाळून टाकल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पुणे नगर महामार्गावर (Pune- Nagar Highway) एका खड्यातून धुर निघत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. यावेळी काही प्रवाशांनी पाहिले असता अर्धवट अवस्थेत मृतदेह जळत असल्याचे प्रवाशांना पहायला मिळाले. ज्यामुळे एकच खळबळ उडाली. या धक्कादायक प्रकारानंतर प्रवाशांनी याबाबतची माहिती शिक्रापूर पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी (Shikrapur Police) घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृतदेह मोठ्या प्रमाणावर जळाल्याने तो पुरूषाचा आहे की महिलेचा हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, कोल्हापूरमध्येही अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूरच्या  कागल-निढोरी राज्य मार्गावर बामणी हद्दीतील शेतात गोटखिंडी इथल्या एका तरुणाचा मृतदेह काल रात्री टाकण्यात आला आहे. या तरुणाच्या डोक्यात वाराच्या खुणा आहेत. या तरुणास इतर ठिकाणी मारून या ठिकाणी मृतदेह आणून टाकला आहे.

अमरसिंह दत्ताजीराव थोरात (amarsinh thorat) (वय ३८) राहणार गोटखिंडी ता. वाळवा जि. सांगली असे या तरुणाचे नाव असल्याचे समजले. कोल्हापूर इथल्या शहाजी लॉ कॉलेज मध्ये द्वितीय वर्षात अमरसिंह शिकत असल्याचे समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT