Jalgaon Bank Robbery: जळगावातील थरार..भरदिवसा स्‍टेट बँकेवर दरोडा; १५ लाखांहून अधिक रक्‍कम घेऊन चोरटे फरार

जळगावातील थरार..भरदिवसा बँकेवर दरोडा; १५ लाखाहून अधिक रक्‍कम घेवून चोरटे फरार
Jalgaon Crime News
Jalgaon Crime NewsSaam tv
Published On

जळगाव : जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेत (SBI) भरदिवसा दरोडा टाकून रोकड लांबविल्याची धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. बँकेतील (Jalgaon) अंदाजे लाखो रूपयांची रोकड लांबविल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. (Maharashtra News)

Jalgaon Crime News
Ashok Chavan News: नांदेड– जालना मार्ग सिमेंटचा न झाल्यास आंदोलन; अशोक चव्हाण यांचा इशारा

जळगाव शहरातील कालींका माता मंदिर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. आज सकाळी नऊ वाजेच्‍या सुमारास बँक उघडून नियमीतपणे कारभार सुरू झाला. यानंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन युवक दुचाकीवरून बँकेत आले. त्यांच्याकडे कोयत्यासारखे धारदार शस्त्र होते. या शस्त्राच्या बळावर त्यांनी व्यवस्थापकासह पाच- सहा कर्मचार्‍यांना धमकावले. शिवाय व्यवस्थापकाच्या मांडीवर कोयत्याने वार देखील केले. यानंतर त्यांनी बँकेतील रोकड लांबवून पलायन केले.

Jalgaon Crime News
Ambegaon News: कपडे धुताना नदीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्‍यू; आईने रोखल्‍याने तिसरी वाचली

१५ लाखाहून अधिक रक्‍कम लंपास

अवघ्या काही मिनिटांमध्ये चोरट्यांनी लुट करून पलायन केले. त्यांनी (Bank) बँकेतील अंदाजे १५ लाखांपेक्षा जास्‍त रूपयांची रोकड लांबविल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बँकेत धाव घेतली. जखमी झालेल्या व्यवस्थापकांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Police) पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अप्‍पर अधिक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीचीचे प्रभारी शंकर शेळके आदींनी सहकार्‍यांसह दाखल झाले. श्‍वास पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com