Ambegaon News: कपडे धुताना नदीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्‍यू; आईने रोखल्‍याने तिसरी वाचली

कपडे धुताना नदीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्‍यू; आईने रोखल्‍याने तिसरी वाचली
Pune Ambegaon News
Pune Ambegaon NewsSaam tv

आंबेगाव : आंबेगाव तालुक्यात एकलहरे सुलतानपूर गावालगत असलेल्‍या नदीवर कपडे धुत असताना दोन सख्ख्या बहिणींचा नदीत पडून मृत्‍यू (Death) झाला आहे. तिसरी त्‍यांना वाचविण्यासाठी (Ambegaon) जात होती. मात्र आईने वेळीच तिला रोखल्‍यामुळे तिचा जीव वाचला आहे. (Tajya Batmya)

Pune Ambegaon News
Nagpur News: भाविकांप्रमाणे पुजाऱ्यांनाही ड्रेस कोड हवा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

एकलहरे सुलतानपूर (ता. आंबेगाव) येथे ही धक्‍कादायक घटना घडली आहे. गावालगत असलेल्‍या घोड नदीवर आई व तिन मुली या आज सकाळी कपडे धुवायला गेल्‍या होत्‍या. कपडे धुवत असताना दोन्‍ही बहिणी पाण्यात उतरल्‍या. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्‍याने त्‍यांचा पाण्यात पडून मृत्‍यू झाला. आरती खंडागळे, प्रिती खंडागळे असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या बहिणींचे नावे आहेत.

Pune Ambegaon News
Nandurbar News: जिल्ह्यात सर्वाधिक कांदा आवक; अधिकृत खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका

आईने रोखल्‍याने तिसरी वाचली

घोड नदीत कपडे धुवायला गेले असताना देान्‍ही बहिणी बुडून मृत झाल्‍या. त्यांच्या मदतीसाठी तिसरी बहिण देखील घोड नदीत उतरत होती. परंतु, आईने प्रसंगावधान राखल्याने तिला बाहेर आणले. यामुळे सुदैवाने तिचा जीव वाचला. कावेरी बाबासाहेब अलझेंडे (वय १२) आणि वर्षा नारायण घोरपडे (वय १७) या दोन मुली सदर घटनेत बचावल्या आहे. यानंतर दोन्‍ही मुलींचा मृतदेह बाहेर काढून शवविच्‍छेदनासाठी नेण्यात आले.

Pune Ambegaon News
Ashok Chavan News: नांदेड– जालना मार्ग सिमेंटचा न झाल्यास आंदोलन; अशोक चव्हाण यांचा इशारा

महिलांचा आरडाओरड

एकलहरे नदीपात्राच्या बाजूने राहत असलेल्या प्रियंका राहुल डोके यांना नदीपात्राजवळ महिलांचा आरडाओरडा ऐकू येत होता. त्यावेळेस त्यांनी पती राहुल डोके यांना फोन करून सदर घटना घडल्याचे सांगितले. यानंतर घटनास्थळी एकलहरे गावचे माजी उपसरपंच दीपक डोके, राहुल डोके, पोलीस पाटील निखिल गाडे, अक्षय धोत्रे, राम फलके, माजी सरपंच संतोष डोके, गौरव बारणे, स्वप्नील गुळवे यांनी घटना समजल्यानंतर नदीपात्रात उड्या मारून सदर मुलींचा शोध घेतला. परंतु घटनेला बराच वेळ झाल्याने आरती आणि प्रीती खंडागळे यांचे मृतदेह हाती लागले. घटनास्थळी मंचर (Police) पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सुदाम घोडे, ट्राफिक पोलीस कर्मचारी सोमनाथ गवारी, धनेश मांदळे, गणेश येळवंडे, अभिषेक कवडे घटनास्थळी येत घटनेचा पंचनामा केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com