Shiv Sena leaders Neelam Gorhe and Chief Minister Eknath Shinde during a party meeting ahead of Pune civic elections. Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Corporation Election: जागा वाटपावरून महायुतीचं बिनसलं, शिवसेना युतीमधून बाहेर पडणार? शिंदे गटाचा अल्टिमेटम

Pune Elections: पुण्यात जागावाटपावरून तणाव वाढलाय. शिवसेनेने महापालिका निवडणुकीसाठी ३५ जागांची मागणी केली आहे. तर भाजपकडून अद्याप सकारात्मक उत्तर देण्यात आले नाहीये.

Bharat Jadhav

  • पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीत तणाव

  • शिवसेनेची ३५ जागांची मागणी, भाजपकडून १५ जागांचा प्रस्ताव

  • समाधानकारक उत्तर न मिळाल्यास “योग्य निर्णय” घेण्याचा इशारा

नाशिकसह पुण्यात भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचं घोडं अडलंय. दोन्ही पक्ष युतीमधून महापालिकेच्या निवडणुकांना समोरे जाणार आहेत. मात्र दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भात अजूनही तोडगा निघाला नाहीये. शिवसेनेला सन्मानजनक जागा हव्यात. भाजपकडून काही उत्तरं आलं नाही तर शिवसेना "योग्य" निर्णय घेणार, असा इशारा निलम गोऱ्हे यांनी दिलाय. त्यामुळे जर पुण्यातील जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर शिवसेना युतीमधून बाहेर पडणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे आणि नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेचा जागा वाटपासंदर्भातील तिढा अजूनही सुटला नाहीये. दोन्ही पक्षांकडून बैठकांचा धडका सुरू आहे. बुधवारी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची बैठक झाली. जवळपास १० तास चालल्या बैठकीतही नाशिक आणि पुण्याचा तिढा सुटला नाही. याच बैठकीत नाशिक महापालिकेमध्ये भाजप शिवसेना २५ ते ३० जागा देण्यास तयार होती. मात्र त्यावर हेमंत गोडसेंसह शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

बुधवारी झालेल्या बैठकीतही पुण्याबाबत कोणताच निर्णय झाला नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर स्थानिक पातळीवर चर्चा आणि बैठका घेण्यात आल्या मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करत आपल्याला सन्मानजक जाग मिळत नसल्याचं म्हटलंय. उद्या सकाळपर्यंत भाजपकडून काही उत्तरं आलं नाही तर शिवसेना "योग्य" निर्णय घेणार असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत. त्याबाबत एकनाथ शिंदेते अंतिम निर्णय घेतील, असेही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान भाजप शिवसेनेला २५ जागा देणार असल्याची चर्चा होती. मात्र हाती आलेल्या माहितीनुसार भाजप फक्त १५ जागा देण्यास इच्छुक आहे. परंतु शिवसेनेकडून ३५ जागांची मागणी केली जातेय. त्यामुळे उद्यापर्यंत भाजपकडून सकारात्मक उत्तर आले नाही तर शिवसेना योग्य विचार करेल असा अल्टीमेटम दिला जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केलं होतं. पण भाजप आणि शिवसेना यांच्यात युती असणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. पण जागावाटपाचं घोडं अडल्यानं शिवसेना युतीतून बाहेर पडणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नांदेड हादरलं! कुटुंबातील चौघांचा मृत्यू; २ तरुण्याबांड पोरांची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या, घरी आई-बापानं जीवन संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Bangladesh: बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, बेदम मारहाण करून जीव घेतला

शिंदेंच्या यशानं, पवारांना टेन्शन! सेना - राष्ट्रवादीत ईर्ष्येची लढाई, अस्वस्थ दादा का भडकले मंत्र्यांवर?

मशालीला कॉग्रेसचा हात? ठाकरेसेनेला कॉंग्रेसचा पाठिंबा

मुंबईनंतर पुण्यातही काँग्रेस एकटी, पुण्यात दादांमुळे मविआत बिघाडी

SCROLL FOR NEXT