पुणे महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू
ईव्हीएम बदलल्याचा आरोप करत राष्ट्रवादी नेत्या आक्रमक
स्ट्राँगरूममध्ये घुसण्याचा व जाळीवर चढण्याचा प्रयत्न
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणी सुरूय. मतमोजणीवर आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील चांगल्याच आक्रमक झाल्या. मतमोजणीवेळी ईव्हीएम मशीन बदलले गेल्याचा आरोप करत त्यांनी स्ट्राँगरुममध्ये त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी जाळीवर चढण्याचा प्रयत्न करत असतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही भडकल्या.
पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल मतमोजणी होतेय. येथे राष्ट्रवादीचे नेत्या रुपाली ठोंबरे यांनी मत मोजणी केंद्राच्या संरक्षण भिंतीवरील जाळीवर चढण्याचा प्रयत्न केला. यामुळे केंद्रावर काही वेळ तणावाची निर्माण झाली. दरम्यान रुपाली ठोंबरे पुण्यातील प्रभाग क्र. २५ अ आणि २६ ब या दोन प्रभागातून निवडणूक लढवत होत्या. या दोन्ही ठिकाणी त्या पराभूत झाल्या.
यावरून त्यांनी आरोप केला की, मतदानादिवशी वापरलेल्या ईव्हीएम मशीन आणि आज मतमोजणीसाठी आणलेल्या मशीनमध्ये तफावत आहे. प्रशासनाने जाणीवपूर्वक मशीन बदलल्या गेल्या असा आरोप त्यांनी केलाय. हा आरोप मशीन बदलल्याचा आरोप करत त्यांनी मतमोजणी केंद्रावर गोंधळ घातला. न्यू इंग्लिश स्कूलमधील सुरक्षा जाळीवर चढून स्ट्राँगरुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
मतमोजणीच्या केंद्रावर पोलीस कर्मचारी दादागिरी करतात. दबावशाही करतात, 'ये गप्प रे, तुला दाखवतो, हिला उचला तिला उचला, असा दम पोलिसांकडून दिला जातो असं रुपाली ठोंबरे म्हणाले. यावेळी पोलिसांवर संताप व्यक्त करताना म्हणाल्या, ही तुमच्या बापाची मक्तेदारी नाहीये. हे फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकारानुसार चालणार. पोलिसांनी निवडणूक अधिकाऱ्यांची वकिली करू नये. तुमच्याकडे डिग्री नाही. तुम्ही फक्त कायदा सुव्यवस्था राखायची , असा रुपाली ठोंबरे म्हणाल्या.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपद्धतीने पार पडण्यासाठी आम्ही काही तांत्रिकबाबींचे आक्षेप घेतलेत. मी उमेदवार आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला ईव्हीएमचे नंबर दिले होते, त्यात त्यांची सही आणि शिक्काही होता. मतदान झालेले आणि मतमोजणीच्या टेबलावर आलेले मशीन वेगवेगळे होत्या, असं ठोंबरे म्हणाल्या. जे मतदानाची मशीन असते, त्याचे नंबर दिले जातात. ते नंबर निवडणूक अधिकारी, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी आणि इतर अधिकाऱ्यांसमोर ऑन कॅमेरा ते नंबर दिले जातात. ही यादी शिक्क्यानुसार आम्हाला देण्यात आली. मात्र मतमोजणीच्या वेळी वेगळ्याच मशीन टेबलावर होत्या. आमच्या कार्यकर्त्यांनी त्या ओळखल्या. आम्ही ज्या मशीनच्या याद्या दिल्या होत्या, आणि टेबलावरील मशीन वेगेळ्या होत्या, असा आक्षेप ठोबरें यांनी घेतला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.