Congress and Thackeray Sena leaders addressing a press conference after announcing alliance for Pune civic elections. saam tv
मुंबई/पुणे

Pune Corporation Election: पुण्यात काँग्रेसच्या हातात मशाल; काँग्रेस-ठाकरे सेनेचं जागावाटप जाहीर

Pune Corporation Election: महापालिका निवडणूकीत रंगत आलीय. महाविकास आघाडी आणि महायुतीत फूट पडलीय. मात्र मुंबईत स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसनं पुण्यात ठाकरेसेनेसोबत युतीची घोषणा केलीय. मात्र कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढणार आहे. पाहूयात.

Bharat Mohalkar

  • पुणे महापालिका निवडणुकीत काँग्रेस-ठाकरेसेना युती जाहीर

  • जागावाटपाचा फॉर्म्युलाही दोन्ही पक्षांकडून घोषित

  • पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने महाविकास आघाडीत फूट

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं महाविकास आघाडीत फूट पडली. तर दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरेसेनेनं पुण्यात युतीची घोषणा केलीय. एवढंच नव्हे तर काँग्रेस आणि ठाकरेसेनेनं जागा वाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर केलाय.

खरंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरु असल्यानं ठाकरेसेना आणि काँग्रेसनं आपापसात बोलणी सुरु केली होती. या चर्चेत मनसेही सहभागी झाली होती. मात्र मनसेला अपेक्षित जागा मिळाल्या नसल्यानं मनसेनं काँग्रेस आणि ठाकरेसेनेच्या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र कोणत्या पक्षाला किती जागा देण्यात आल्या आहेत. पाहूयात.

पुणे महापालिकेत ठाकरेसेनेला 45, काँग्रेसला 60 जागा देण्यात आल्या आहेत.मात्र मनसेनं 32 जागांची मागणी केली होती. त्यापैकी ठाकरेसेनेनं 21 जागाच दिल्या. त्यामुळे मनसेनं युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. हे असं असलं तरी ठाकरेसेना मात्र मनसेला सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती ठाकरेसेनेनं दिलीय.

खरंतर 2017 मध्ये पुणे महापालिकेत शिवसेनेला 10 तर काँग्रेसला 9 जागांवर विजय मिळाला होता. आता शिवसेनेत फूट पडलीय. त्यानंतरही पुण्यातील कोथरुड, हडपसर, पर्वती, दत्तवाडी आणि वडगाव शेरीत ठाकरेसेनेचा प्रभाव आहेत. तर कसबा पेठ, पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर आणि मध्यवस्तीत काँग्रेसचा प्रभाव आहे. आता पुण्यात भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वेगवेगळे लढत असताना काँग्रेस आणि ठाकरेसेनेनं एकीचा नारा दिलाय.. त्यामुळे महायुतीतील मतांमध्ये फूट पडली असताना काँग्रेस आणि ठाकरेसेनेचं एकीचं बळ महायुतीला रोखण्यात यशस्वी होणार का? आणि पुणेकर काँग्रेस आणि ठाकरेसेनेला स्वीकारणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Namo Shetkari Yojana: ९४ लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबर! १० दिवसात खात्यात जमा होणार ₹४०००

Silver Rate: बापरे! चांदीने ओलांडला ३ लाखांचा टप्पा! आज १ किलो चांदीसाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये

US Vs Iran: अमेरिका 48 तासात इराणवर करणार हल्ला? चीनची इराणला लष्करी मदत?

Maharashtra Live News Update: कल्याण–डोंबिवलीतील 53 नगरसेवक कोकण भवनच्या दिशेने रवाना

Jalna : तीन महिन्यात ७ वेळा सापाने दंश; जालन्यातील तरुणीसोबत भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT