Pune Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात कॉन्ट्रॅक्टरची आत्महत्या, व्हिडीओ शूट करत संपवलं आयुष्य

Pune Police: पुण्यामध्ये आत्महत्येची घटना समोर आली आहे. कॉन्ट्रॅक्टरने राहत्या घरी टोकाचे पाऊल उचललं. गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली.

Priya More
  • पुण्यात कॉन्ट्रॅक्टरची आत्महत्या

  • पुण्यातील डायस प्लॉट परिसरातील घटना

  • खलील शेख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली

  • आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हिडिओ शूट करून अनेक गंभीर आरोप केले

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक वादातून कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. राहत्या घरी गळफास घेत त्यांनी आयुष्य संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी स्वतः व्हिडीओ शूट करत अनेक आरोप केले आहेत. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ते तपास करत आहेत.

पुण्यातील डायस प्लॉट या भागात ही घटना घडली. खलील शेख असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आर्थिक वाद, पैश्यांची देवाण घेवाण आणि बुडलेल्या पैसे यातून उद्भवलेल्या प्रकरणातून कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. खलील शेख यांनी जीवन संपवण्यापूर्वी सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. तसंच त्यांनी अनेक व्हिडीओ शूट करून अनेकांची नावं घेत गंभीर आरोप केले आहेत. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. अद्याप गु्न्हा दाखल करण्यात आला नाही.

धुळ्यामध्ये देखील अशीच घटना घडली. एका तरुणाने आत्महत्या केली. तरुणाने आत्महत्येपूर्वी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रित करून सोशल मीडियावर व्हायरल केला. संदीप गिरासे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव होते. शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथील तरुणाने तापीत तरुणाने उडी घेत आत्महत्या केली.Pune Crime

या तरुणाच्या आत्महत्येनंतर ग्रामस्त आक्रमक झाले आहेत. गावकऱ्यांनी पोलीस ठाण्या बाहेर ठिय्या आंदोलन केले. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या कंपनी मालकासह इतर ४ जणांविरोधातध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कंपनीच्या त्रासाला कंटाळूनच तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT