Surabhi Jayashree Jagdish
कारची बॅटरी साधारणपणे ३ ते ४ वर्षे चालते. तिचं आयुष्य कारचा वापर, हवामान आणि देखभाल यावर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक कारमध्ये बॅटरी एकाच कालावधीपर्यंत टिकेल असे नाही.
कार वारंवार अगदी कमी अंतरासाठी चालवल्यास बॅटरीला पूर्ण चार्ज होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अशा वापरामुळे बॅटरीवर जास्त ताण येऊ शकतो आणि तिचं आयुष्य कमी होऊ शकतं. त्यामुळे कारचा सतत फक्त छोट्या अंतरासाठी वापर होत असेल तर बॅटरीची स्थिती तपासत राहा.
कार बराच काळ सुरू केली नाही तर बॅटरी हळूहळू डिस्चार्ज होऊ शकते. कार बंद असतानाही काही इलेक्ट्रॉनिक यंत्रणा थोडी वीज वापरत राहतात. त्यामुळे कार दीर्घकाळ वापरायची नसेल तर बॅटरीची स्थिती घ्या.
अतिउष्णता आणि अतिथंडी या दोन्हीचा कारच्या बॅटरीच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. खूप जास्त किंवा खूप कमी तापमानामुळे बॅटरीच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे अशा हवामानात बॅटरीकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे.
बॅटरीच्या टर्मिनलवर गंज किंवा घाण जमा झाल्यास बॅटरीची कार्यक्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे टर्मिनलवर घाण किंवा गंज जमा झालंय का, हे वेळोवेळी तपासा.
कार बंद केल्यानंतर हेडलाइट, म्युझिक सिस्टम किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं सुरू ठेवू नयेत. ही उपकरणं बॅटरीमधील वीज वापरत राहतात आणि त्यामुळे बॅटरी डिस्चार्ज होऊ शकते. कार सोडण्यापूर्वी सर्व दिवे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद आहेत की नाही, हे तपासा.
बॅटरीची वेळोवेळी तपासणी केल्यास तिच्यातील संभाव्य समस्या लवकर लक्षात येऊ शकतात. कार सुरू करताना त्रास होत असेल हेडलाइटची रोषणाई कमी वाटत असेल किंवा बॅटरीची वॉर्निंग लाइट सुरू झाली असेल तर बॅटरी तपासून घ्यावी.