Nana Patole Narendra Modi Saam Tv
मुंबई/पुणे

तिरंग्याचे महत्व दुरंग्यांना कळणार नाही; नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

भाजपच्या काळात गरिबांच तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती फक्त मोदींचा झुला राहिला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव -

पुणे: तिरंग्याचे महत्व दुरंग्यांना कळणार नाही, देशाचे प्रधानमंत्री तिरंग्याने घाम पुसतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस (Pune City District Congress) कमिटीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज पुण्यात पद यात्रा काढण्यात आली होती. पदयात्रेच्या समारोप प्रसंगी बोलताना पटाले यांनी भाजपसह पंतप्रधानांवर टीका केली.

यावेळी बोलतान पटोले म्हणाले, लोकमान्य टिळकांच्या जन्मभुमीत आपण हा अमृतमहोत्सव करत आहोत. कारण त्यांनी जो नारा दिला होता 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आज तोच नारा देण्याची वेळ आली आहे. आज आपल्या देशात असाच नारा देण्याची गरज निर्माण झाली असून देशाला पुन्हा एकदा स्वातंत्र्याची गरज आहे.

पाहा व्हिडीओ -

देशाच्या स्वातंत्र्यात ज्यांचा काहीच वाटा नाही असे लोक देशात सत्तेवर आलेत, त्यांनी संविधानाच महत्त्व संपवण्याचे काम सुरू केलं आहे. भाजपा सरकार इंग्रजासारखं आणि हुकूमशहासारख वागत आहे.

भाजप आधी चिवडा पार्टी होती, आता बिर्याणी पार्टी झाली आहे. गोरगरीब लोकांकडून पैसा वसूल करून मुख्य ४-५ लोकांना वाटण्याचे काम भाजप करत आहे. भाजपच्या काळात गरिबांच तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती फक्त मोदींचा झुला राहिला. असं म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली.

देशाची परिस्थिती हालाखीची करण्याच पाप भाजपने केलं. कोरोना (Corona) या मोदीने आणला आणि आम्हाला मारलं अशी भावना गोरगरीब जनता व्यक्त करत आहेत. नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे जगातील पहिले नेते आहेत जे आपल्या देशात दुसऱ्या देशातील प्रमुखांचा प्रचार करतात होय मोदी तुमच्या 'नमस्ते-ट्रंप' मुळे देशात कोरोना आला.

देशातले लोक म्हणत आहेत ते घरच नाही तर झेंडा लावू तरी कुठे? मग कसलं हर 'घर झेंडा अभियान' सगळ्यात मोठा खोटा पंतप्रधान देशाने पाहिला असल्याची जहरी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: जालन्यातील बदनापूर तालुक्यातील पाडळी शिवारात मुसळधार पाऊस

Maharashtra Government: सरकार शेतकऱ्यांना देणार गुड न्यूज: मुख्यमंत्री लवकरच पूर्ण करणार राज्यातील बळीराजाची मोठी मागणी

Mumbai Local: मध्य रेल्वेला पावसाचा फटका, लोकलसेवा उशिराने; घराकडे निघालेल्या प्रवाशांचे हाल

थँक्स माय फ्रेंड! रशियाच्या पुतिन यांच्या फोननंतर PM मोदींनी मानले आभार, ट्रम्प काय म्हणाले सगळं काही सांगितलं!

Crime : कानशिलात लगावल्याने बायको भडकली, रागाच्या भरात नवऱ्याचा प्रायव्हेट पार्टच कापला

SCROLL FOR NEXT