pune news  saam tv
मुंबई/पुणे

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा, आमदार सुनील शेळके आणि RTI कार्यकर्ते सुनील गुजर यांच्यात तुफान खडाजंगी

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि आरटीआय कार्यकर्ते सुनील गुजर यांच्यात जोरदार खडाजंगी होऊन, दोघांनी एकमेकांविरोधात बंडगार्डन पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.

Saam Tv

दिलीप कांबळे, मावळ

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके आणि मावळमधील आरटीआय (RTI) कार्यकर्ते सुनील गुजर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या वादानंतर दोन्ही बाजूंनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात आमदारांनी मारहाण केल्याचा आरोप गुजर यांनी केला आहे, तर आरटीआय कार्यकर्ता आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा प्रत्यारोप आमदारांनी केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात नेमकं काय घडलं?

आमदार सुनील शेळके हे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी दुपारी तीनच्या सुमारास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांना तिथे आरटीआय कार्यकर्ते सुनील गुजर दिसले. गुजर यांना पाहताच संतापलेल्या शेळके यांनी त्यांना एका खोलीत नेले. त्यानंतर गुजर यांची बॅग ओढून घेऊन त्याची तपासणी केली असता, त्या बॅगेत शेळके यांच्या नावाशी संबंधित कागदपत्रे आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.

दोन्ही बाजूंचे आरोप-प्रत्यारोप

RTI कार्यकर्ते सुनील गुजर यांचा आरोप

आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप सुनील गुजर यांनी केला आहे. गुजर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची बॅग ओढून घेत त्यांना एका खोलीत नेऊन मारहाण करण्यात आली.

आमदार सुनील शेळके यांचा आरोप

दुसरीकडे, सुनील गुजर हे गेल्या वर्षभरापासून आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप आमदार शेळके यांनी केला आहे. आरटीआयच्या माध्यमातून स्वतःशी संबंधित माहिती मिळवून ती विरोधकांसह गुन्हेगारांना पुरवली जात असल्याचाही दावा त्यांनी केला. तसेच, दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने आरटीआय अर्ज करून आपल्याशी संबंधित कागदपत्रे मिळवण्यात आल्याचा गंभीर आरोपही शेळके यांनी केला आहे.

CCTV तपासणीतून काय समोर आलं?

या प्रकरणी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार, गुजर यांना खोलीत नेईपर्यंतच्या फुटेजमध्ये आमदार शेळके यांनी त्यांना स्पर्श केल्याचे दिसून आलेले नाही. मात्र, ज्या खोलीत मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे, त्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नव्हता. त्यामुळे आमदार शेळके यांनी गुजर यांना मारहाण केल्याचा सबळ पुरावा अद्याप मिळाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे .

सत्य बाहेर येईलच – आमदार सुनील शेळके

दरम्यान, आमदार सुनील शेळके यांनी मारहाणीचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. मारहाण केली असती तर कुठे लागले हे दाखवावे, उगाच खोटे-नाटे आरोप करू नयेत. तसही पोलीस चौकशी करत आहेत, त्यातून सर्व सत्य बाहेर येईलच. माझी कागदपत्रे त्याने कशासाठी ठेवली होती? तो माझी माहिती कोणाला पुरवत होता? गेली दीड-दोन वर्षे तो माझ्यावर पाळत का ठेवत होता? याची सखोल चौकशी पोलिसांनी करावी," अशी मागणी आमदार शेळके यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घशातील चिकट कफ निघता निघत नाहीये? 'हे' ६ घरगुती उपाय करून पाहा

Health Tips : दुपारच्या जेवणानंतर लगेच झोप का येते? जाणून घ्या यामागची ६ सोपी कारणे

Maharashtra News Live Update: अहिलनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

Cancer Symptoms: अचानक वजन कमी होतंय? किती किलो वजन घटणं हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं? डॉक्टरांनी सांगितले महत्त्वाचे संकेत

Gyanesh Kumar: मोठी बातमी! निवडणूक आयोगात मोठा फेरबदल, ज्ञानेश कुमारांनी २० CEO बदलले

SCROLL FOR NEXT