pune city traffic diverted today till 2 pm know the route Saam Digital
मुंबई/पुणे

Pune City Traffic Diverted : पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर आज वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Lok Sabha Election 2024 : पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार अर्ज दाखल करण्यापूर्वी शांताई हॉटेल ते क्वार्टर गेट चौकदरम्यान एकत्र येणार आहेत.

Siddharth Latkar

- अक्षय बडवे

Pune :

बारामती लोकसभा मतदारसंघातील (baramati lok sabha constituency) उमेदवार समर्थकांसह आज (गुरुवार) अर्ज दाखल करण्यापूर्वी कौन्सिल हॉल चौक ते हॉटेल ब्ल्यू नाईल चौकदरम्यान एकत्र येणार आहेत. त्यामुळे सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आल्याची माहिती वाहतुक पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

पुण्यातील कौन्सिल हॉल ते ब्ल्यू नाईल चौकदरम्यान रस्ता वाहतुकीस बंद राहील असे पाेलिसांनी कळविले आहे.

ब्ल्यू नाईल चौकाकडून आय.बी. चौकाकडे जाणारी वाहने किराड चौक, साधू वासवानी पुतळामार्गे जातील किंवा एस.बी.आय. हाऊस येथून रैना रस्त्याने इच्छितस्थळी जातील. सदर्न कमांड ते साधू वासवानी पुतळ्याकडे जाणारी आणि येणारी वाहने काऊन रस्ता जंक्शन आणि साधू वासवानी पुतळा येथून वळविण्यात येईल.

हॉटेल शांताई चौक ते क्वार्टर गेट चौक रस्ता वाहतुकीस बंद राहील.

पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार अर्ज दाखल करण्यापूर्वी शांताई हॉटेल ते क्वार्टर गेट चौकदरम्यान एकत्र येणार आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूक सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीस बंद राहील.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

क्वार्टर गेटकडून येणारी वाहने बच्चू अड्डा किंवा सरबतवाला चौकमार्गे इच्छित स्थळी

पॉवर हाऊस चौकाकडून येणारी वाहने शांताई चौकमार्गे क्वार्टरगेटकडे जाणारी वाहने बॅनर्जी चौकातून किंवा संत कबीर चौकमार्गे इच्छितस्थळी जातील असे कळविण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात, माजी सरपंच आणि नातीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

PM Kisan Yojana: 'त्या' शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा हप्ता, कारण काय? वाचा

Vice President Election: उपराष्ट्रपती पदाच्या मतदानावेळी India आघाडीची नाही, तर BJPची मतं फुटली; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

Nepal News : महाराष्ट्रातील १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले, सर्वाधिक पर्यटक 'या' जिल्ह्यातील | VIDEO

Maharashtra Live News Update : माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण, पूजा गायकवाडला 3 दिवसाची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT