Pune Water Supply Updates Saam TV
मुंबई/पुणे

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा राहणार बंद

pune news: पाऊस लांबण्याच्या शक्यतेमुळे धरणातील पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत पुरविण्यासाठी महापालिकेने दर गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव

pune News: पुणेकरांसाठी पाणीपुरवठ्याबाबत महत्वाचं वृत्त हाती आलं आहे. पुणे शहरात पाणीपुरवठा गुरुवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र, तरीही पाऊस लांबण्याच्या शक्यतेमुळे धरणातील पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत पुरविण्यासाठी महापालिकेने दर गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

पुणे शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद ठेवल्यानंतर दुसर्‍या दिवशी शुक्रवारी अनेक भागांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने मात्र दरवेळीच्या तुलनेत अत्यल्प तक्रारी आल्याचा व तक्रारी आलेल्या भागात टँकरने पाणीपुरवठा केल्याचा दावा केला आहे.

पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहिल्यानंतर शुक्रवारी रास्ता पेठ, गणेश पेठ, कोंढवा, मुंढवा, औंध, बाणेर-बालेवाडी परिसरातून तक्रारी आल्या होत्या. याचबरोबर तरी बाणेर-बालेवाडी परिसर, आपटे रस्ता, कॅम्पचा काही भाग, तसेच नाना पेठ, भवानी पेठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, दत्तवाडी परिसर, कोंढवा-मुंढवा आदी परिसरात पाण्याविषयी कमी-अधिक स्वरूपाच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या.

दरम्यान, पाणीपुरवठा बंद राहिल्याने त्यादिवशी जलवाहिनीत हवा साठून दुसऱ्या दिवशीचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. दरम्यान, यावेळी २० ठिकाणी गेल्या आठवड्यातच एअर व्हॉल्व्ह बसविण्यात आले. तसेच यंदाही जलकेंद्रांच्या टाक्या नेहमीपेक्षा दोन तास आधीच भरण्यात आल्या

पुण्यात यावेळी यंदाही जलकेंद्रांच्या टाक्या नेहमीपेक्षा दोन तास आधीच भरण्यात आल्या. त्यामुळे शुक्रवारी तक्रारींचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Namo Bharat Video : धक्कादायक! नमो भारत ट्रेनमधील 'त्या' कपलचा दुसरा व्हिडिओ व्हायरल

CSMT रेल्वे स्थानकावर AI वापरून बनावट पास; तरुणावर गुन्हा दाखल|VIDEO

Special Fruit Juice: हिवाळ्यातील 'हा' ज्यूस प्यायल्याने स्किन आणि पचनासाठी ठरेल फायदेशीर

Maharashtra Live News Update: अंधेरी पश्चिमेकडील लिंक रोडवरील सिटी मॉलच्या टेरेसला आग

Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या बैठकीत राडा, बडा नेता ढसाढसा रडला

SCROLL FOR NEXT