Couple Romance Viral Video: बॉलिवूड सिनेमांमध्ये आपल्याला भर रस्त्यातच हिरो आणि हिरोइन ऐकमेकांना गळाभेट घेताना दिसतात. त्यानंतर ट्राफिक जाम होत आणि पुढे काही गोष्टी घडतात. असे अनेक प्रसंग आपण पाहिले आहेत. परंतु प्रत्यक्षात जर अशी घटना घडली तर काय होईल?, याची अपेक्षाच कोणी करू शकत नाही. मात्र, अशी घटना एक घटना पुण्यात घडली आहे. तसेच यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Viral Video)
सांंस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुणे (Pune) शहराची ओळख आता बदलायला लागली आहे. शहरातील बदलत जाणाऱ्या या संस्कृतीमुळे अनेक गार्डन अन् पर्यटन स्थळे लव्ह पाईंट झाली आहेत. मात्र सध्या एका व्हायरल व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तरुण- तरुणी चक्क भररस्त्यात रोमान्स करताना दिसत आहेत. भररस्त्यावर सुरु असलेल्या या प्रकारामुळे वाहतूक थांबली होती. वाहतूक पोलीस अन् जमलेली लोक त्या दोघांना आवरण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु एखाद्या चित्रपटाप्रमाणे रस्त्यात त्यांचा रोमान्स सुरु आहे.
पुण्यातील एका चौकात एक तरूण आणि तरुणी ऐकमेकांच्या गळ्यात गळे घालून उभे असतानाचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भर रस्त्यातच हे कपल रोमांस करत असल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तसेच येथील लोकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. व्हिडिओमध्ये रस्त्यावर एक कपल एकमेकांना अलिंगन देताना दिसत आहे. यादरम्यान वाहतूकही ठप्प झाली. वाहतूक पोलिसही या दोघांना हटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
या कपलवर कारवाई होण्याची गरज होती. परंतु रोमान्स करुन जसे काहीच झाले नाही, या पद्धतीने ते दोघे रवाना झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी दोघांना शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तर काही पुणेकरांनी अशा लोकांमुळेच पुण्याची बदनामी होते, म्हणत या जोडप्यावर टीका केली आहे. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.