Share Market Update : शेअर बाजारात आज मोठी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये 1000 हून अधिक अंकांची उसळी पाहायला मिळाली. तर निफ्टीने देखील 272 अंकांची मुसंडी मारली.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आज शेअर बाजाराचा ट्रेन्ड बुलीश दिसला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण दिसलं.
आजचं ट्रे़डिंग सेशन बंद झालं त्यावेळी सेन्सेक्समध्ये 1.78 टक्क्यांसह 1.31 अंकांची वाढ नोंदवली गेली. तर निफ्टीमध्ये 1.59 टक्क्यासह 272 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्स आज 58931 वर बंद झाला, तर निफ्टी 17353 वर बंद झाला. बँक निफ्टीमध्ये 1.75 टक्क्यांसह 698 अंकांची वाढ झाली. (Latest Marathi News)
रिलायन्सच्या शेअरमध्ये 4.50 टक्क्यांची वाढ
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिडेटचे शेअर आज टॉप गेनर राहिले. रिलायन्सच्या शेअरमध्ये आज 4.50 टक्क्यांची वाढ दिसली. रिलायन्सचा शेअर 100.55 रुपयांच्या वाढीसह 2,335.25 रुपयांवर ट्रेड करत होता. याशिवाय आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स 3.06 टक्क्यांनी, नेस्ले इंडियाचे शेअर्स 2.39 टक्क्यांनी, टाटा मोटर्सचे शेअर्स 2.69 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.