Scene from Pune’s Chandan Nagar where a scrap shop theft attempt turned fatal after workers allegedly beat the intruders, leaving one dead and two injured. Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: भंगार दुकानात चोरीसाठी आलेल्या चोरट्याला बेदम मारहाण; रात्रभर मारहाणीनंतर एकाचा मृत्यू, दोन जखमी

Horror in Chandan Nagar: पुण्यातील चंदननगर परिसरात भंगार दुकानात चोरीसाठी घुसलेल्या तिघा चोरट्यांपैकी एकाचा रात्रभर झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. दोन जण गंभीर जखमी असून पोलिसांनी दुकानमालक आणि कामगारांना ताब्यात घेतलं आहे.

Akshay Badve

पुण्यामध्ये गुन्हेगारीचे सत्र सुरूच आहे. खून, दरोडे, मारहाण, खंडणी या घटनांमुळे शहरात भीतीचे सावट आहे. अशातच शहरातील चंदननगर परिसरात मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. भंगाराच्या दुकानात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चोरट्याला दुकानमालक आणि कामगारांनी पकडून रात्रभर बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका चोरट्याचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मृत चोरट्याचं नाव नवाज इम्तियाज खान (वय २६) असं आहे. ही घटना रात्री तीनच्या सुमारास चंदननगर परिसरात घडली. प्राथमिक माहितीनुसार, तिघे चोरटे चोरीसाठी एका भंगाराच्या दुकानात शिरले होते. मात्र त्यावेळी दुकानातील काही कामगार जागे झाले आणि त्यांनी चोरट्यांना पकडलं. संतापलेल्या कामगारांनी चोरट्यांचे हातपाय बांधून त्यांना बेदम मारहाण केली.

या मारहाणीत नवाज खान या चोरट्याचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित दोन साथीदार गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी घटनेची माहिती पोलिसांना मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी चोरट्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर मृत नवाज खानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी दुकान मालक आणि संबंधित काही कामगारांना ताब्यात घेतले असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार, चोरीचा प्रयत्न करताना चोरट्यांना रंगेहात पकडल्याने कामगारांनी आत्मरक्षण आणि संतापाच्या भरात मारहाण केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बीडमध्ये होणार छगन भुजबळांची महाएल्गार सभा

ST Employees Bonus: ST कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा होणार गोड! सरकारकडून इतका बोनस जाहीर|VIDEO

Lasun Sev Recipe : घरीच बनवा झणझणीत-कुरकुरीत लसूण शेव, दिवाळीच्या फराळाची वाढेल रंगत

Akola ZP Election : अकोला जिल्हा परिषद आरक्षणाची अधिसूचना जाहीर; कुठल्या सर्कलसाठी कुणाचं आरक्षण? वाचा

Akshaya Deodhar: 'तुझ्यात जीव रंगला' मधील अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं, फोटोंवरून नजर हटणार नाही

SCROLL FOR NEXT