PUNE CRIME saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime: २ तरुणांना नग्न करून दिला करंट, आठ दिवस डांबून ठेवत मारहाण करून बियरच्या बॉटलवर बसवले

Pune Chandan Nagar Two Friends Assault Case: पुण्यातील चंदननगर परिसरात मैत्रिणीला फितवल्याच्या संशयातून दोन तरुणांना मारहाण करून आठ दिवस डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Akshay Badve

आपल्या मैत्रिणीला आपल्याच मित्राने फीतवल्याच्या संशयातून पुण्यात दोन तरुणांसोबत एक धक्कादायक प्रकार घडला. ४ जणांनी त्यांच्याच दोन मित्रांना एका इमारतीमध्ये नेऊन विद्युत करंट देऊन मारहाण केली आली त्यानंतर एकमेकांना अश्लिल कृत्य करायला लावून, त्याचे व्हिडिओ ही काढण्यात आले. इतकचं नाही तर आरोपींनी या दोन जणांना बियर च्या बॉटल वर बसवण्याचे सुद्धा अमानूष कृत्य केल्याचं समोर आलं आहे. तब्बल ८ दिवस डांबून ठेवलेल्या दोन तरुणांनी कसबसे आपला जीव वाचवला. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून एका नराधमाला अटक करण्यात आली आहे. या घटनेचे व्हिडिओ इतके भयानक आहेत की त्यातील फक्त काहीच व्हिडिओ हे प्रसारित केले जाऊ शकतात. घडलेल्या इतक्या क्रूर आणि किळसवाण्या प्रकारामुळे पुणे शहर हादरले आहे.

हा सगळा प्रकार १३ ऑक्टोबर पासून २४ ऑक्टोबर दरम्यान चंदननगर भागात घडला. याप्रकरणी ओंकार गोसावी नावाच्या तरुणाने पोलिसात तक्रार दिली आहे. यावरून शुभम पाटील, आशिष अंधारे आणि त्याच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे एका खाजगी कंपनीसाठी ड्रायव्हर म्हणून काम करतात. फिर्यादी हे चंदननगर भागात असलेल्या त्यांचे मित्र समर्थ जायभाय याच्या रूम वर आराम करण्यासाठी जात असे. १३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे जायभाय याच्या खोलीवर युनिफॉर्म बदलण्यासाठी गेले होते. याठिकाणी त्याचा मित्र प्रथमेश पाटील हा उपस्थित होता परंतु समर्थ त्यावेळी तिथे नव्हता. संध्याकाळी ७ वाजता समर्थ याचे मित्र शुभम पाटील, आशीष अंधारे व त्यांचे सोबत इतर दोन अनोळखी व्यक्ती तिथे आले. त्यांनी येताच प्रथमेश ला "समर्थ कुठे आहे?" असे विचारले व फिर्यादी यांना देखील समर्थ बाबत विचारुन त्यांच्या गाडीची चावी हिसकावून घेतली.

फिर्यादीनुसार, या आरोपींनी फिर्यादी आणि प्रथमेश या दोघांना जबरदस्तीने जवळ असलेल्या एका इमारतीत नेले. त्याठिकाणी फिर्यादी आणि व प्रथमेश या दोघांना शुभम व त्याच्या साथीदारांनी कपडे सुखवण्याचे लोखंडी स्टॅन्डने डोक्यात व पाठीत मारले. ते स्टॅन्ड तुटल्याने त्याच गजाने हातावर मारले व फिर्यादी यांच्या डोक्यात इस्त्री घातली. यातील एका व्यक्तीने शुभम याला "यांचे कपडे काढा" असे सांगितले. आम्ही कपडे काढण्यास नकार दिल्याने एका अनोळखी व्यक्तीने वायर ने कंरट दिला, त्यामुळे आम्ही घाबरुन आमचे पुर्ण कपडे काढले," असं देखील फिर्यादी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर त्या दोघांना बियअरच्या रिकाम्या बॉटल वर बसायला भाग पाडले व दोघांना एकमेकांसोबत अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या दोन जणांनी घटनेचे व्हिडिओ काढले आणि पोलीसांना किंवा इतर कोणाला या बाबत सांगण्याचा प्रयत्न केला, तर फोटो वायरल करण्याची धमकी दिली.

फिर्यादी यांनी म्हटलेल्या फिर्यादीत, यावर आरोपी थांबले नाहीत त्यांनी, या दोघांना एका गाडीत जबरदस्तीने बसवून लातुर जिल्ह्यातील एका गावात असणाऱ्या शेतात नेले. त्या दिवशी रात्री पुन्हा त्यांना पुण्यातील खराडी भागात आणून एका रूम मध्ये डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी, आरोपी शुभम ने फिर्यादी यांना समर्थ याला फोन लावण्यास सांगितले व "तु कोठे आहेस? मला घ्यायला ये," असे जबरदस्तीने बोलायला लावले. त्यानंतर आरोपी शुभम राहत असलेल्या आणखी एका खोलीवर नेत ८ दिवस डांबून ठेवलं. चेहऱ्यावरील व अंगावरील मारहाणीच्या जखमा नीट झाल्यावर २४ ऑक्टोबर रोजी आरोपी शुभम ने या दोघांना मुंबईतील एका मॉल मध्ये नेलं. एका मोबाईलच्या दुकानात फिर्यादी यांना नेत, आरोपींनी तिथून पळ काढला. फिर्यादी यांनी मोबाईल दुकानदार यांना सगळी हकीकत सांगुन पोलिसांची मदत मागितली. तेव्हा तेथील मॅनेजर यांनी माझ्या वडिलांसोबत बोलने करुन फिर्यादी यांना घरी जाण्यासाठी पैसे देवुन पाठवुन दिले.

त्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी फिर्यादी आणि समर्थ हे त्यांच्या वडीलांना भेटले. तीन दिवसांनी फिर्यादी यांच्या वडीलांना एका कॅब चालकाने त्याच मोबाईल आणून दिला. नग्न फोटो व्हायरल करतील या भितीमुळे व मारहाणीमुळे फिर्यादी घाबरले मात्र अखेर धाडस करुन त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि हा सगळा प्रकार समोर आला आहे. आपल्या मैत्रिणीला समर्थ ने फितवले असल्याचा संशय मनात येऊन आरोपी शुभम ने हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी याबाबत एका तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ११८(१), १२७(४), १४०(३), ३(५), ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : नात्याला काळिमा! मध्यरात्री सख्ख्या भावानेच काढला भावाचा काटा; धक्कादायक कारण आलं समोर

Karjat crime : कर्जतमधील बैलगाडा शर्यत मैदानावर आढळला तरुणाचा मृतदेह; हत्येनंतर चेहऱ्यावर टाकलं अॅसिड

Breaking News : मोठी बातमी! शरद पवार सत्तेत कधी सहभागी होणार? शिवसेनेच्या बड्या नेत्यानं थेट तारीख सांगितली

Maharashtra News Live Update: उद्या सकाळी १० वाजता सुप्रिया सुळे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शरद पवार पक्षाची बैठक

चहलनंतर आणखी एका क्रिकेटरची राजकारणात एण्ट्री होणार? भाजप अध्यक्षांसोबतचा फोटो व्हायरल,चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT