Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Traffic Protest : चाकणपेक्षा गुजरात बरा! वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उद्योजक रस्त्यावर उतरले

Pune News : पुण्यात औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर उद्योजक, कामगार आणि नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. वाहतूक कोंडीमुळे उद्योगांना बसणारा आर्थिक फटका लक्षात घेऊन आज मोठा मोर्चा PMRDA कार्यालयाकडे मार्गस्थ झाला आहे.

Alisha Khedekar

  • चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीविरोधात उद्योजक, कामगार आणि नागरिक रस्त्यावर उतरले आहेत

  • हा मोर्चा PMRDA कार्यालयाकडे मार्गस्थ झाला आहे

  • वाहतूक कोंडीमुळे उद्योजकांना मोठा फटका बसत आहे

  • प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात उद्योजक आक्रमक झाले आहेत

पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. या वाहतूक कोंडीचा फटका मोठ्या प्रमाणावर उद्योजकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर उद्योजक आणि पुणेकर या वाहतूक कोंडीविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. हा मोर्चा आज पुणे-नाशिक महामार्गावरून आकुर्डी येथील PMRDA कार्यालयाकडे मार्गस्थ झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर उद्योजकांनी थेट रस्त्यावर उतरून आवाज उठवला आहे. चाकणमधील उद्योजक, कामगार आणि स्थानिक नागरिकांचा मोठा मोर्चा आज पुणे-नाशिक महामार्गावरून आकुर्डी येथील PMRDA कार्यालयाकडे मार्गस्थ झाला आहे.

मागील वीस वर्षांपासून सुरू असलेली वाहतूक कोंडी चाकणच्या औद्योगिक विकासासाठी मोठी अडथळा ठरतं आहे. यामुळे लहान-मोठ्या उद्योगांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसत असल्याची चिंता उद्योजकांनी व्यक्त केली आहे. चाकणसारख्या औद्योगिक क्षेत्राला आवश्यक सुविधा न मिळाल्यामुळे अनेक उद्योजक आता थेट गुजरातसारख्या राज्यांमध्ये मिळणाऱ्या सुविधांचे कौतुक करत महाराष्ट्रातील प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत आहेत.

दरम्यान, PMRDA आणि प्रशासनाने चाकणच्या वाहतूक समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप समितीकडून करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुर्दशा आणि अपुऱ्या नियोजनामुळे त्रस्त नागरिक आता या आंदोलनातून कायमस्वरूपी मार्ग काढण्याच्या निर्धार या आंदोलनातुन दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांचं टेन्शन वाढलं; ऐन निवडणुकीत मित्रपक्षाने पाठिंबा काढून घेतला

Realme 16 Pro: 200MP चा कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी, स्पेशल युवा वर्गासाठी रियलमीने लाँच केली 16 Pro सिरीज

Maharashtra Live News Update: - अहिल्यानगर नावावरून राजकारण तापलं, संग्राम जगतापांचं मुख्यमंत्र्यांसमोर जनतेला आवाहन

Sangli Politics: ऐन निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का; उमेदवारावरच थेट हद्दपारीची कारवाई

ठाकरे कुटुंब आमचे मतदार, शिंदेंचा उमेदवार प्रचारासाठी थेट मातोश्रीवर, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT