Chakan rape case Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime News : चाकण अत्याचार प्रकरणात नराधम तरुणाला अटक, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं; आरोपीने दिली कबुली

Pune Chakan Rape Case : ‘रस्त्यानं जात असलेली महिला मला दिसली आणि मी तिला बाजूला ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला,’ असा कबुली जबाब आरोपीनं दिला आहे.

Prashant Patil

पुणे : चाकण परिसरात रात्रीच्या शिफ्टसाठी कामावर निघालेल्या एका २७ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार १३ मे रोजी रात्री उशिरा घडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पीडितेच्या धैर्यामुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपीस अवघ्या २४ तासात अटक करण्यात आली आहे. मेदनकरवाडी येथील या कंपनीच्या अगदी जवळ ती पोहोचली. त्याचवेळी नराधमाने तिला जबरदस्तीनं एका इमारतीच्या मागील बाजूस ओढून नेलं. तिथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून, मारहाण केली आणि कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. महिलेनं प्रतिकार केला, आरोपीला चावाही घेतला. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. मग तिथूनच निघालेल्या महिला कामगार आणि काही पुरुषांच्या मदतीनं पीडितीनं चाकण पोलिसांना याबाबत कळवलं. दरम्यान, आता आरोपीने आपला कबुली जबाब पोलिसांना दिल्याची माहिती आहे.

चाकण येथील मेदनकरवाडी भागात एका तरूणीला रस्त्यावरून फरफटत नेत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीला पोलिसांनी चोवीस तासांच्या आत अटक केली आहे. प्रकाश तुकाराम भांगरे (सध्या रा. मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. अकोले, जि. अहिल्यानगर) असं या नराधम आरोपीचं नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर, न्यायालयाने त्याला २० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ‘रस्त्यानं जात असलेली महिला मला दिसली आणि मी तिला बाजूला ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला,’ असा कबुली जबाब आरोपीनं दिला आहे.

नेमकं काय घडलं?

पीडित तरूणी नाइट शिफ्टसाठी कंपनीत जात होती. अत्याचाराच्या घटनेबाबात पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त, शिवाजी पवार यांनी माहिती देताना सांगितलं की, 'ही घटना मंगळवारी रात्री घडली आहे. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तरूणी रात्रपाळीसाठी कामावर जात होती. एका पॉईंटपर्यत त्यांना पायी जावं लागतं, त्या ठिकाणी पिकअप पॉईंटपर्यंत जात असताना आरोपीनं तिचा पाठलाग केला, एका ठिकाणी त्यानं मागून येऊन तोंड दाबलं, त्यानंतर गळा दाबत तिला एका कॉम्प्लेक्सच्या मागे घेऊन गेला. त्यानंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यादरम्यान त्या रस्त्यावर दोघेजण जात होते, त्यानंतर त्या तरूणीनं त्यांना पाहून मोठ्याने आरडाओरडा केला, त्यानंतर तो आरोपी घाबरून घटनास्थळावरून पळून गेला. एका कपलने त्या तरूणीची मदत केली, पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने ६ विशेष तपास पथकं तयार केली. पोलिसांनी हद्दीतील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण करून आरोपीला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT