Saam Tv
मुंबई/पुणे

CET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! CET परीक्षा वर्षातून ३ वेळा होणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra JEE MAIN Exam : महाराष्ट्रात आता CET परीक्षा वर्षातून तीनदा घेतली जाणार असून विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळणार आहे. एप्रिल, मे आणि डिसेंबर २०२६ मध्ये पीसीएम, पीसीबी आणि एमबीएच्या प्रवेशासाठी CET घेण्याचा राज्याचा निर्णय जाहीर.

Alisha Khedekar

महाराष्ट्रात CET वर्षातून दोनदा व नंतर तीनदा घेण्याचा निर्णय

एप्रिल, मे आणि डिसेंबर २०२६ मध्ये CET परीक्षा होणार

दोन परीक्षांपैकी ज्या परीक्षेत जास्त गुण, तीच प्रवेशासाठी ग्राह्य

विद्यार्थ्यांना तणावमुक्त व वाढीव संधी उपलब्ध होणार

सचिन जाधव, पुणे

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. JEE - MAINच्या धर्तीवर महाराष्ट्रात दोनदा सीईटी घेण्याचा निर्णय चांगला असून, विद्यार्थ्यांना एक वाढीव संधी मिळण्याबरोबरच गुणात्मक वाढ करता येणार आहे. तसेच, २०२६ मध्ये एप्रिल, मे महिन्यात आणि डिसेंबर महिन्यात अशी तीनदा सीईटी परीक्षा होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी सीईटीचा ट्रिपल धमाका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून आगामी शैक्षणिक वर्षात पीसीएम, पीसीबी व एमबीए या तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (CET) दोन वेळा घेण्यात येणार आहे. या टप्प्यातील पहिली प्रवेश परीक्षा एप्रिल-२०२६ मध्ये, तर दुसरी प्रवेश परीक्षा मे २०२६ मध्ये घेण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून २०२६ चे प्रवेश होतील.

डिसेंबर २०२६ मध्ये घेण्यात येणारी तिसरी सीईटी परीक्षा आणि एप्रिल २०२७ मध्ये घेण्यात येणारी परीक्षा या माध्यमातून २०२७ मधील प्रवेश राबविले जाणार आहेत. पीसीएम, पीसीबी व एमबीए या तीन अभ्यासक्रमांसाठी या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थी दशेत परीक्षा देत असताना अनेकवेळा अपयश येत. त्यामुळे त्यांना आणखी एक संधी मिळणे गरजेचे असते.

JEE-MAIN वर्षातून दोनदा होत असल्यामुळे सीईटी देखील दोनदा घेण्याची मागणी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात CET सेलकडे गेल्या अनेक वर्षांपासून केली होती. हा एक सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असून, दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असेल. जर विद्यार्थ्याने दोन प्रवेश परीक्षा दिल्या, तर त्याला दोन्हींपैकी ज्यामध्ये जास्त गुण असतील त्या प्रवेशासाठी गृहीत धरले जातील. यातून विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा देता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT