Pune Nashik Highway Accident: Saamtv
मुंबई/पुणे

Pune Nashik Highway Accident: नेपाळमधील पर्यटकांच्या बसचा भीषण अपघात, ४३ प्रवासी जखमी; चौघांची प्रकृती चिंताजनक

रोहिदास गाडगे

Pune Nashik Highway Accident:

पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुणे नाशिक महामार्गावर पेठ जवळ जागेवर उभ्या असलेल्या ट्रकला बसने पाठीमागून धडक दिली. या अपघातात बसमधील ४३ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Pune Nashik Highway Accident News)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नेपाळवरुन देवदर्शन आणि पर्यटनस्थळांना भेटीसाठी आलेल्या नेपाळी प्रवाशांच्या बसचा पुणे - नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) भीषण अपघात झाला. महामार्गावर पेठ जवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिली.

या धडकेत बसमधील ४३ प्रवासी जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत अपघातग्रस्त लोकांची मदत केली. दुर्घटनेतील जखमी प्रवाशांना मंचर (Manchar) येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Accident News)

चौघांची प्रकृती चिंताजनक..

जखमींपैकी चार प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही सांगण्यात येत आहे. ही धडक इतकी जोरदार होती की बसचा अक्षरशः चक्काचूर झाला. हे सर्व प्रवासी नेपाळमधून देवदर्शन आणि पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी आल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारताच्या रणरागिणी पाकिस्तानवर पडल्या भारी! हरमनप्रीत शेवटपर्यंत लढली

Mumbai Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी

Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी पैसे वाटल्याचे आरोप सिद्ध करावेत, दीपक केसरकरांचं खुलं आव्हान

VIDEO : स्मारकाच्या शोधत राजे; महाराजांच्या नावाने खेळ करू नका, संभाजीराजेंनी दिला इशारा

Jayant Patil : पटेलांच्या पुतळ्यापेक्षा कोणताही पुतळा उंच असू नये, हे ठरवलंय ; जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT