VIDEO : स्मारकाच्या शोधत राजे; महाराजांच्या नावाने खेळ करू नका, संभाजीराजेंनी दिला इशारा

Sambhajiraje Chhatrapati : 8 वर्ष उलटूनही अद्यापही समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम झालेलं नसल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी आक्रमक भूमिका घेत कार्यकर्त्यांसह या ठिकाणची पाहणी केली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा शोध घेण्यासाठी पाहणी केली. सरकारने 2016 साली या स्मारकाच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केला होता. मात्र 8 वर्ष उलटूनही अद्यापही यात काहीच प्रगती झाली नाही म्हणून संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर पोलिसांकडून संभाजीराजे यांना दुर्बिणीतून शिवस्मारकाचे स्थान पाहण्याची परवानगी देण्यात आली. आपल्या 50 कार्यकर्त्यांसह संभाजीराजे यांनी बोटीतून या ठिकाणची पाहणी केल्यानंतर राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधला.

'बोटीतून मी दुर्बिणीने अरबी समुद्रात स्मारक पाहत होतो. पण मला समुद्रात स्मारक कुठेही दिसलं नाही. आपण तिथपर्यंत जाऊ शकतो का असं बोटवाल्यांला विचारल्यावर परवानगी नसल्याचं त्यांनी सांगितलं. 2 तास फिरलो. पण जलपूजन झालेली जागा कुठेही दिसली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव राजकारणात चांगल्यासाठी वापरा. खेळ करू नका. मुंबई मनपा निवडणूक असताना ते लक्षात ठेवून या स्मारकाची घोषणा केली. आता पर्यावरणप्रेमींनी विरोध केला, अशी तक्रार करून चालत नाही. तुम्ही डायरेक्ट पंतप्रधानांना बोलावून जलपूजन करतात, हे पूर्णपणे जनतेला फसवण्याचे काम या सरकारने केलं' असल्याची टीका संभाजीराजे यांनी केली. तसेच दरवर्षी जसे महाराजांचे नाव राजकारणात वापरले जाते, या निवडणुकीमध्ये तसे होऊ देणार नाही, असा इशाराही संभाजीराजे यांनी दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com