सचिन जाधव, पुणे|ता. २१ जानेवारी २०२४
पुण्याच्या खडकवासला धरण परिसरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पानशेत धरणाजवळ खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अठरा वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्ञानेश्वर बालाजी मनाळे (वय 18 रा. खराडी, पुणे) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरात (Pune) खराडी परिसरात राहणारा ज्ञानेश्वर बालाजी मनाळे हा तरुण आपल्या मित्र- मैत्रिणींसोबत पर्यटनासाठी पाणशेत धरण परिसरात आला होता. यावेळी सेल्फी काढताना त्याच्या दोन मैत्रिणी पाण्यात पडल्या. मैत्रिणी पाण्यात पडल्याचे पाहून ज्ञानेश्वर मनाळे हा तरुण त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरला, यामध्ये त्याचा बुडून मृत्यू झाला.
याबाबतची माहिती मिळताच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे जवानांनी त्याचा शोध घेतला आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत वेल्हा पोलिस ठाण्याचे कर्मचारी व ग्रामीण पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गुजरातमध्ये घडला होती मोठी दुर्घटना..
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी गुजरातमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची बोल उलटून १४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गुजरातच्या हरणी येथील व्होटनाथ तलावात ही मुले बोटिंगसाठी आली होती. यावेळी बोट उलटून १४ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 12 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा समावेश होता. या दुर्देवी घटनेवर पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) शोक व्यक्त केला होता. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.