pune news  saam tv
मुंबई/पुणे

Saam Impact: अर्ध अंधत्व; डोक्याला टॉर्च लावून अभ्यास करत लेकानं दहावीचं मैदान मारलं, साम टीव्हीच्या बातमीनंतर आमदारांनी घेतली भेट

Shivam Story: अर्ध अंधत्व असल्याने दहावीच्या परीक्षेत डोक्याला टॉर्च लावून उत्तीर्ण झालेल्या पुण्यातील शिवम निफाडकर याची पुण्यातील कसबाचे आमदार हेमंत रासने यांनी भेट घेतली

Omkar Sonawane

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे: अर्ध अंधत्व असल्याने दहावीच्या परीक्षेत डोक्याला टॉर्च लावून उत्तीर्ण झालेल्या पुण्यातील शिवम निफाडकर याची पुण्यातील कसबाचे आमदार हेमंत रासने यांनी भेट घेतली. पुण्यातील दहावी उत्तीर्ण अंध विद्यार्थी शिवम निफाडकरची भाजप आमदार हेमंत रासने यांनी त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्याला शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अर्ध अंधत्व असलेला पुण्यातील शिवम निफाडकर याने डोक्याला विशेष टॉर्च लावत दहावीच्या बोर्डाची परीक्षा दिली होती. शिवम दुर्गम आजारापासून व्यथित असल्यानं त्याला फक्त दिवसा दृष्टी आहे पण रात्री अंधत्व असल्यामुळे त्याला रात्री अभ्यास करता येत नाही. शिवम याला जन्मल्यानंतर या आजाराला सामोरे जावं लागलं. पुण्यातील पटेल शाळेतून प्राथमिक शाळेतून शिक्षण घेत होता.

आयुष्याचा महत्वाचा टप्पा असल्याने शिवमच्या आईने त्याला ऑनलाईन पोर्टलवरून एक पोर्टेबल टॉर्च मागवली. या टॉर्चच्या सहाय्याने शिवम हा रात्री अभ्यास करत होता. परीक्षेदरम्यान, अनेक वर्गात अंधार असतो त्यामुळे शिवम याला दिसणार नाही म्हणून त्याच्या आईने बोर्डाला विनंती केली होती. दहावीच्या परीक्षेपूर्वी शिवमच्या आईने शिक्षण बोर्डाला विनंती अर्ज केला होता. ज्यामध्ये शिवमच्या अंधत्वचा दाखला दिला होता. तसेच त्याला डोक्यावर टॉर्च लावून पेपर लिहण्यासाठी अर्ज लिहला. बोर्डाने तो अर्ज मंजूर केला. शिवम ने बोर्डाचे सर्व पेपर डोक्यावर टॉर्च लावून त्यातील उजेडाच्या साह्याने लिहिले. बोर्डाचा निकाल लागला आणि शिवम याला ६८ टक्के मिळाले.

मात्र, मिळालेल्या ६८ टक्क्यांवर शिवम खुश नाही कारण त्याला इयत्ता अकरावीचे शिक्षण पुण्यातील नामांकित सर परशुराम भाऊ म्हणजेच एस पी कॉलेजमधून घ्यायचं आहे, पण या कॉलेजला ६८ टक्के गुणांवर कोणी ऍडमिशन देणार नाही ही भावना मनात असल्यामुळे निकाल लागल्यानंतर शिवम रडत होता.

"साम टिव्ही" ने शिवम ची प्रेरणादायी आणि जिद्दीची कहाणी दाखवल्यानंतर शिवम वर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. जेव्हा वर्गात अंधार होता, तेव्हा टॉर्चचा प्रकाश त्याच्या जिद्दीचा साथीदार ठरला. अशा कठीण परिस्थितीतही हार न मानता यश मिळवणाऱ्या शिवमचा अभिमान वाटतो असं मत भाजप ने व्यक्त केलं आहे. शिवमच्या पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा शब्द भाजप ने त्याला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बीडमध्ये वाल्मीक कराडचे बॅनर, बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

Health Tips : तुम्ही सुद्धा चपातीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवताय? मग वेळीच थांबा, नाहीतर...

Migraine Care: प्रवास करताना डोकेदुखी होतेय? जाणून घ्या कारणं अन् त्यावर सोपे उपाय

Ladki Bahin Yojana Scam : लाडक्या बहिणींचे पैसे लाटले, आता १४ हजार पुरुषांवर होणार कारवाई; सरकारचा इशारा

SCROLL FOR NEXT