Pune police rush to Koregaon Park after a bomb threat at a five-star hotel, later confirmed as a fake call. saamtv
मुंबई/पुणे

Pune Bomb Threat: पुण्यातील 5 स्टार हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल, धमकीनं पोलिसांची झोप उडाली

Pune Five-Star Hotel Bomb Threat: पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 5 स्टार हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. हॉटेलमध्ये धमकीचा कॉल आल्यानंतर त्वरीत हॉटेल रिकामे करण्यात आले. मात्र तपासात बॉम्बशोधक पथकाला कोणतेही स्फोटके आढळली नाहीत.

Bharat Jadhav

  • कोरेगाव पार्क येथील 5 स्टार हॉटेल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी

  • ही घटना शुक्रवारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली

  • अवघ्या काही वेळातच पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक हॉटेलवर दाखल

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

पुणे शहरातील ५ स्टार हॉटेल बॉम्बनं देण्याच्या फोन कॉल आल्यानंतर पोलिसांची झोप उडाली. शहरातील प्रसिद्ध असलेल्या कोरेगाव पार्कमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची कॉल आल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला. मात्र शोधानंतर हॉटेलमध्ये आलेला कॉल हा फेक कॉल असल्याचं निष्पन्न झालं. ही घटना शुक्रवारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती.

हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा कॉल हॉटेलच्या लँडलाईनवर आल्याने एकच धावपळ उडाली. हॉटेल व्यवस्थपकांनी त्वरीत हॉटेल खाली केलं. पोलिसांना त्याची माहिती दिली. पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने तात्काळ हॉटेलची तपासणी मात्र पोलिसांना बॉम्ब मिळाला नाही. त्यानंतर हॉटेलवर आलेला कॉल हा 'फेक कॉल' असल्याचे स्पष्ट झालं.

त्यानंतर पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी हॉटेलचे सिक्युरीटी मॅनेजर यांनी फिर्याद दिलीय. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात ९८३२२५२५१७ या मोबाईल क्रमांक धारकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , शुक्रवारी एका मोबाईल नंबर वरून पुण्यातील कोरेगाव पार्क भागात असलेल्या पंच तारांकित हॉटेलच्या अधिकृत लँडलाईनवर फोनवर कॉल आला. मोबाईल वरून संबंधित व्यक्तीने "हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे.

तात्काळ हॉटेल रिकामे करा" अशी धमकी दिली. हॉटेल प्रशासनाने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. अवघ्या काही वेळातच पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक हॉटेलवर दाखल झाले. हॉटेलची कसून तपासणी करण्यात आली. त्यानंतर हा खोटा व बनावट कॉल असल्याचे समोर आले. हा खोडसाळ प्रकार कोणी केला आहे याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंच्या मनसेचे २ उमेदवार गायब? राजकीय वर्तुळात खळबळ

कल्याणमध्ये मोठी राजकीय घडामोड; दोन दिग्गज नेत्यांची एकत्र बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

Ladki Bahin eKYC: थर्टी फर्स्टची डेडलाईन तरी ई-केवायसी सुविधा सुरूच; लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक घोळ?

Friday Horoscope : नव्या वर्षाचा पहिला शुक्रवारी ठरेल लकी; जुळणार प्रेमाच्या रेशीम गाठी, ५ राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

SCROLL FOR NEXT