Pune Politics Pankaja munde  
मुंबई/पुणे

Pune Politics: महायुतीत बिनसलंय! शिंदे गटानंतर भाजप नेत्यांची उघड नाराजी; पंकजा मुंडेंसमोरच मांडलं गाऱ्हाणं!

Bharat Jadhav

सागर आव्हाड

विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, त्याचप्रमाणे महायुतीतील खदखद समोर येत आहे. आधी शिंदे गटाचे नेत्यानी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी समोर आलीय. पुण्यातील वडगाव शेरीमध्ये पंकजा मुंडे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटाबाबत नाराजी व्यक्त केलीय. लोकसभा निवडणुकीवरून भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराज झाले आहेत.

राज्यात मोठा राजकीय भूकंप करत अजित पवार, शिंदे-फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं. मात्र शिंदे गटातील नेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्याने नाराज असल्याचं म्ह्टलं जात आहे. नाराजीबाबत बोलतांना भरत गोगावले म्हणाले, नाराज होऊन काय करणार? वस्तुस्थिती ती स्वीकारावी लागेल असे मिश्किल भाष्य केलं. तर अजित पवार यांच्याबाबत थोडीफार नाराजी तर राहणारच असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता भाजप पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय. आज पंकजा मुंडे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत वडगावशेरीची जागा भाजपला मिळावी, अशी मागणी केली. भाजपचे अर्जुन जगताप वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष म्हणाले, लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादी अजित पवार गटाने मुरलीधर मोहोळ यांचं काम केलं नाही. अशी तक्रार जगताप आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडेंकडे केली. भारतीय जनता पक्षाला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाची जागा मिळावी अन्यथा आम्ही काम करणार नसल्याचं पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे

आता जी महायुती झाली ती खूप वेगळा अनुभव होता. नवनवीन अनुभवी येत असतात. राष्ट्रवादीचे फुटली आयुष्य भर ज्या राष्ट्रवादीचे सोबत लढलो. त्यातील एक गट आपल्यासोबत आले. वाटत आम्हाला विचारत नाही. पण सत्तासाठी काही गणित मांडावी लागतात . सत्तेसाठी काही तह करावे लागतात. शेवटी सत्ता महत्त्वाचं असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्यात.

आज पक्षाने घालून दिलेल्या कार्यक्रम प्रमाणे वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील 150 कार्यकर्ते बैठक झाली. कार्यकर्ताच्या भावना आहे. मतदारसंघ भेटावं हे नैसर्गिक आहे. प्रत्येक कार्यकर्ताला मतदारसंघ आपल्याला भेटवा, असं वाटतं. जागा वाटपाचा निर्णय वरच्या पातळीवर होईल. शंभर टक्के सर्व कार्यकर्ताचे समाधान होणार आहे. फार नाराजीचे वातावरण नसल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्यात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT