Pune News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, रमी खेळताना भाजप पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; पुण्यात खळबळ

Pune BJP : पुण्यात पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत मोठी कारवाई केली. पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्याला रमी खेळताना ताब्यात घेतलं. यामुळे पुण्यात खळबळ उडाली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यात रेव्ह पार्टीनंतर आता जुगार उड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सोमवारी जुगार अड्ड्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी जुगार खेळताना एका भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह २ ते ३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप पदाधिकाऱ्याला पकडण्यात आल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात भाजपचा पदाधिकाऱ्याला जुगार अड्ड्यावरून पोलिसांनी ताब्यात घेतलं. जुगार खेळताना या भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची आणि सहकारनगर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापेमारी केली. औदुंबर विठ्ठल कांबळे असे या भाजपच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. कांबळे याच्यासोबत इतर २ ते ३ जण जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा टाकला. या सर्वांविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, औदुंबर कांबळे हा पर्वती विधानसभा मतदारसंघाचा भाजपचा चिटणीस म्हणून कार्यरत आहे. कांबळे त्याच्या इतर दोन ते तीन सहकाऱ्यांसोबत तळजाई परिसरात असणाऱ्या एका रिकाम्या कारखान्यात रमी खेळत होता. यावेळी सहकार नगर पोलिस आणि गुन्हे शाखेच्या युनिट २ ने छापा टाकला. त्यावेळी हे सर्वजण जुगार खेळत असल्याचे आढळून आलं. डाव रंगात आला असतानाच पोलिस त्याठिकाणी पोहचल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पुण्यात काही दिवसांपूर्वी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापेमारी केली होती. या छाप्यात सहाय्यक पोलिस फौजदाराला पोलिसांनी रंगेहाथ पडकडले होते. पुण्यातील नारायण पेठेतील हरिभाऊ साने वाहनतळामध्ये हा जुगार सुरु होता. जुगार खेळताना सहाय्यक पोलिस फौजदारसह ३३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस दलाची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी या पोलिसाचे निलंबन करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; ठाणे जिल्ह्यातील बडा नेता अजित पवारांच्या गळाला

Maharashtra Live News Update : नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली

Face Care: नॅचरल ग्लोईंग चेहरा हवा असेल; मग रोज रात्री 'या' आइस क्यूबने चेहऱ्याचा मसाज नक्की करा

Chhagan Bhujbal: उठले की हॉस्पिटल, सुटले की पुन्हा हॉस्पिटल, पिऊन पिऊन किडनी खराब; मनोज जरांगेंवर कुणी केला गंभीर आरोप?

Heart attack habits youth: तरुणपणात हृदयाचे आजार का वाढतायत? डॉक्टरांनी सांगितली कारणं... बघा तुमचं हार्ट धडधाकट आहे का?

SCROLL FOR NEXT