Pune Accident  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; १० वाहने एकमेकांना धडकली, घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी, VIDEO

Vishal Gangurde

सागर आव्हाड, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : राज्यात अपघातांचे सत्र सुरुच आहे. पुण्यातही अपघातांची मालिका सुरु आहे. पुण्यातील वारजेमध्ये विचित्र अपघाताची घटना घडली आहे. पुण्यातील वारजेमध्ये १० वाहने एकमेकांना धडकली आहेत. या विचित्र अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुण्यातील मुंबई-बेंगळुरु महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पुण्यातील वारजेजवळील हैदराबाद बिर्याणीसमोर दहा वाहने एकमेकांवर आढळून विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याची मिळत आहे.

पुण्यातील विचित्र अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आहेत.

अपघातस्थळी नेमकं काय घडलं?

पुण्यातील वर्दळीचं ठिकाण असलेल्या वारजे येथे १० वाहने एकमेकांना धडकली आहेत. ही वाहने अचानक एकमेकांना कशी धडकली, याची माहिती अद्याप हाती आलेली नाही. मात्र, अपघातानंतर वाहनचालक,प्रवासी आणि रस्त्यावरील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. या अपघातानंतर वारजेजवळी मुंबई-बेंगळुरु महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या विचित्र अपघातानंतर बघ्यांची देखील मोठी गर्दी झाली. काही लोक थेट वाहनांच्या छतावर उभे राहिले. तर काही जण फोटो आणि व्हिडिओ काढण्यात मग्न होते.

वारजेतील या विचित्र अपघातानंतर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यात आली. त्यानंतर इतर वाहनांना पुढे जाण्यासाठी वाट मोकळी करण्यात आली. त्यानंतर वाहतूक कोंडी कमी झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT