Industrialist Booked for Repeated Assault on MPSC Student Saam Tv
मुंबई/पुणे

MPSC विद्यार्थिनीला लग्नाचं खोटं वचन; उद्योगपतीकडून वारंवार शारीरिक संबंध, बारामतीत नेमकं काय घडलं?

Industrialist Booked for Repeated Assault on MPSC Student: बारामतीतील भयंकर प्रकरण उघड. लग्नाचं खोटं वचन देऊन एमपीएससी विद्यार्थिनीवर बलात्कार. नामांकित उद्योगपतीविरोधात गुन्हा.

Bhagyashree Kamble

  • MPSC विद्यार्थिनीकडून उद्योगपतीवर गंभीर आरोप.

  • बलात्कार अन् लग्नाचं खोटं वचन दिल्याचा आरोप.

  • बारामतीतील धक्कादायक प्रकरण उघड.

बारामती येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एमपीएसी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीनं नामांकित उद्योगपतीवर गंभीर आरोप केले आहेत. वारंवार बलात्कार केल्याचा आरोप तिनं केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीनुसार, प्रसिद्ध उद्योगपतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडित तरूणी आणि आरोपी उद्योगपतीची ओळख २०२१ साली बारामतीत झाली होती. मोठ्या व्यवसायिकाची ओळख सांगून उद्योगपतीनं तरूणीचा विश्वास जिंकला. नंतर पीडित तरूणी आणि तिच्या मैत्रिणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपीनं जवळीक साधली. २०२१ सालापासून पुण्यात तरूणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागली.

या काळात उद्योगपती आणि तरूणीचं नियमित बोलणं व्हायचं. ऑगस्ट २०२१ साली आरोपीनं चारचाकीमध्ये पीडितेवर जबरदस्ती केली. नंतर लग्नाचं खोटं वचन देऊन विविध हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध ठेवले. २०२२ साली पीडितेचे दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न झाले. २०२३ साली पीडित तरूणी वेगळी राहू लागली. या काळातही लग्नाचं आश्वासन देत आरोपीनं पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले.

२०२५ साली तरूणीनं लग्नाबाबत विचारणा केली. समाजातील प्रतिष्ठेचा हवाला देत आरोपीनं लग्न करण्यास नकार दिला. त्यावेळी प्रेग्नन्सी टाळण्यासाठी आरोपीनं तरूणीला गोळ्या दिल्या, असा आरोपही पीडितेनं केला. याच प्रकाराला कंटाळून पीडित तरूणीनं हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच नामांकित उद्योगपतीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी विविध कलमांखाली आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. माहितीनुसार, ही घटना २०२१ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आजचा दिवस कोणासाठी लकी? कृष्ण नवमीमुळे या राशींना मिळणार अनुकूल परिणाम

Mumbai Crime News: मुंबईतून मुलांना कोण करतंय गायब? 36 दिवसांत 82 मुलं बेपत्ता

KDMC News: बेकायदेशीर उपायुक्त पदावरून संजय जाधव यांची हकालपट्टी, कल्याण डोंबिवली महापालिकेत खळबळ

सावधान! बिबट्यामुळे होणार रेबीज? तज्ज्ञांचं स्पष्ट मत

Mumbai Police: आनंदाची बातमी! कमी किंमतीत हक्काची घरं; पोलिसांच्या घरांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT