CCTV captures fatal truck-bike accident in Baramati. Saam tv
मुंबई/पुणे

Pune : दुचाकी स्लीप झाली अन् धावत्या ट्रकखाली गेली, दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

Baramati Accident, Pune Road Accident : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सुपे येथे मालवाहतूक ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. दुचाकी घसरल्यानंतर ट्रकच्या चाकाखाली आल्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Baramati Supe road accident latest news : पुण्यातील बारामती तालुक्यातील सुपेमध्ये मालवाहतूक ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. या अपघातात २ सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय. अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, दुचाकी घसरल्याने हा अपघात झालाय. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेचे थरारक दृश्य परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

बारामती तालुक्यातील सुपे चौफुला मार्गावरील अहिल्यादेवी चौकात मालवाहतूक ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. सोमनाथ दत्तात्रय ठोंबरे आणि शुभम दत्तात्रय ठोंबरे अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही बारामती तालुक्यातील सुपे परिसरातील शेंडगेवाडी येथील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही भाऊ आपल्या दुचाकीवरून (क्रमांक: MH 42 E 1878) घराकडे जात होते. अहिल्यादेवी चौकातून वळण घेत असताना त्यांची दुचाकी अचानक घसरली. त्याच वेळी मोरगावच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकचे (क्रमांक: MH 10 CR 4199) मागील चाक त्यांच्या अंगावरून गेले.

या भीषण अपघातात सोमनाथ ठोंबरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर शुभम ठोंबरे गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.एकाच घरातील दोन सख्ख्या भावांचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण बारामती तालुक्यात शोककळा पसरली आहे आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळ मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

Sunday Horoscope : आज 'या' राशींना मिळणार मोठी संधी; कामाचा ताण होणार कमी, वाचा रविवारचे राशीभविष्य

Weather Update : ऊन-सावल्यांचा खेळ अन् विजांचा कडकडाट! महाराष्ट्रातील 'या' भागांमध्ये पावसाचा इशारा, जाणून घ्या आजचे हवामान

Heart Attack : हार्ट अटॅकचा धोका लहान मुलांमध्ये का वाढतोय? 'या' ६ कारणांकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर...

पेपरफुटीच्या घटनांनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; भरती प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना

SCROLL FOR NEXT