बारामती नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम राखलंय.
बसपाचा ‘हत्ती’ बालेकिल्ल्यात सुसाट धावली. बसपाची २१ वर्षांची तरुणी विजयी
संघमित्रा चौधरी बारामतीतील सर्वात तरुण नगरसेवकांपैकी एक ठरल्या आहेत.
अंतर्गत नाराजीमुळे अजित पवार गटाला बारामतीत फटका बसल्याचं बोललं जात आहे.
पुण्यातील बारामती नगरपरिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व कायम ठेवलं आहे. बारामतीत सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत. तर नगराध्यक्षही राष्ट्रवादीचा झाला आहे. अजित पवारांच्या बारामती बालेकिल्ल्यात बसपाचा 'हत्ती' सुसाट धावला आहे. बारामतीत अवघ्या २१ वर्षांची तरुणी नगरसेवक बनली आहे.
बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने खातं उघडलं आहे. तर दोन अपक्ष उमेदवारांचाही विजय झाला आहे. शरद पवार गटाच्या पक्षानेही खातं उघडलं आहे. बारामतीत एकूण ६ इतर उमेदवार विजयी झाले आहेत. अंतर्गत नाराजीमुळे अजित पवारांना बारामतीतच फटका बसल्याचं बोललं जात आहे.
बसपाचे उमेदवार संघमित्रा चौधरी या कमी वयाच्या विजयी नगरसेवक आहेत. त्यांनी एकविसाव्या वर्षी बारामतीच्या नगरपरिषदेत विजय मिळवला आहे. बहुजन समाज पक्षाच्या नूतन नगरसेवक संघमित्रा चौधरी विजयानंतर म्हणाल्या की, 'मी एकटीच बारामतीच्या विकासासाठी प्रयत्न करत राहील. जिथे विरोध करायचा, त्या ठिकाणी विरोध दिसेल. आमच्याकडे महापुरुषांचे विचार आहेत. तेच विचार घेऊन मी पुढे जाईल'.
'अजित पवारांनी बारामती झोपडपट्टी मुक्त करण्याचे स्वप्न पाहिलं आहे. त्याची सुरुवात आमच्या प्रभागातून करावी, नाही तर मी सुयोग बाहेर आंदोलन करेल. आम्ही बोलणार नाही. तर आम्ही करून दाखवणार आहे, असेही त्यांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.