Pune Bandh Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Bandh : राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात आज पुणे बंद; पोलिसांचा मोठा फौजफाटा

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, संभाजी ब्रिगेड आणि इतर काही संघटनांनी आज पुणे बंदची हाक दिली आहे.

Dnyaneshwar Choutmal

Pune Bandh News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकर (Pune) समितीच्या वतीने या बंदचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, संभाजी ब्रिगेड आणि इतर काही संघटनांनी आज पुणे बंदची हाक दिली आहे. (Pune Bandh Today)

पुण्यातील व्यापारी संघटना फेडरेशन ऑफ ट्रेडर्स असोसिएशन ऑफ पुणे (FATP) चे अध्यक्ष फतेहचंद रांका यांनी आजच्या 'बंद'ला पाठिंबा देण्याचा आणि दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.या बंद दरम्यान संपूर्ण शहरात सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी सुमारे 100 वरिष्ठ अधिकारी, 1000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून तर लाल महाल पर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. आज सकाळी 9.30 वाजता डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मूकमोर्चास प्रारंभ होणार आहे. मोर्चाची सांगता झाल्यानंतर जाहीर सभाही होणार आहे. खासदार, उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजी राजे, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सुमारे साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

मोर्च्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहर पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या,गृहरक्षक दलाचे जवान यांच्यासह स्थानिक पोलीस ठाणे, गुन्हे शाखेची पथक तैनात करण्यात आला आहे. तसेच कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

काय म्हणाले होते राज्यपाल?

'तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला तुमचे आदर्श इथेच मिळतील, असं कोश्यारी म्हणाले. औरंगागबाद येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केद्रींय मंत्री नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डी. लिट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पनवेलमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांची बैठक; प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र, ठरवली पुढील रणनीती

साखरेचे दर पुन्हा कडाडणार! साखर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज; साखरेचे नेमके दर किती वाढणार?

Sheeps Won Thar: ना मेंढरं विकली, ना व्यवसाय सोडला! मेंढरांसोबतच घरी आली रुबाबदार थार

AI in Medical Science: माणूस 1400 वर्षे जगणार? AI माणसाला दीर्घायुषी करणार? AI मुळे वृद्धत्वाची प्रक्रिया थांबणार?

Mandar Kiwale Case: पाच दिवसआधीच ठरला किवळेच्या हत्येचा प्लॅन; आरोपींचं पोलिसांनाच खुलं आव्हान

SCROLL FOR NEXT