Pune rickshaw fare today 
मुंबई/पुणे

पुणेकरांनो रात्री १२ नंतर रिक्षाने प्रवास करताय? नव्या भाडेवाढीचा आकडा पाहून उडेल झोप; पाहा नवे दर

Pune rickshaw fare today : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षाची भाडेवाढ लागू झाली आहे. पहिल्या १.५ किमीसाठी ₹३०, पुढील प्रत्येक किमीसाठी ₹२० आणि रात्री २५% अतिरिक्त भाडे आकारता येणार आहे.

Namdeo Kumbhar

Pune auto fare new rates : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ऑटो रिक्षाने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आता थेट कात्री लागणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTO) मंजूर केलेली नवीन रिक्षा भाडेवाढ अखेर शहरात लागू करण्यात आली आहे. या नवीन नियमानुसार केवळ दिवसाचेच नव्हे, तर रात्रीच्या प्रवासाचे दर आणि सामानाचे शुल्कही वाढवण्यात आले आहे.

नवीन दरपत्रकानुसार, पहिल्या १.५ किलोमीटरच्या प्रवासासाठी आता थेट ३० रुपये मोजावे लागणार असून, त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २० रुपये आकारले जाणार आहेत. इतकेच नाही तर, रात्री १२ ते सकाळी ५ या वेळेत प्रवास करणाऱ्यांकडून २५ टक्के अतिरिक्त भाडे वसूल करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्यात रात्रीचा रिक्षा प्रवास चांगलाच महागणार असून, या निर्णयाचे पडसाद सर्वसामान्यांच्या खिशावर उमटताना दिसत आहेत.

नवीन दरानुसार पहिल्या १.५ किलोमीटरसाठी ३० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २० रुपये भाडे तसेच आकारण्यात येणार आहे.रात्री १२ ते सकाळी ५ या कालावधीत २५ टक्के अतिरिक्त भाडे आकारण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्राबाहेरील ग्रामीण भागासाठी रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत ४० टक्के अतिरिक्त भाडे आकारता येणार आहे. तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रातील ऑटोरिक्षांमधून प्रवाशांसोबत नेण्यात येणाऱ्या सामानासाठी ६० x ४० सें.मी. आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या नगासाठी ३ रुपये शुल्क आकारण्यास अनुमती देण्यात आली आहे.

ऑटोरिक्षांचे मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रवासी व चालकांच्या सोयीसाठी सुधारित भाड्यानुसार तात्पुरते टॅरिफ कार्ड तयार करण्यात आले असून, त्याची वैधता २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत राहणार आहे. त्यानंतर टॅरिफ कार्डचा वापर करता येणार नसून प्रवाशांकडून मीटरप्रमाणेच भाडे स्वीकारणे बंधनकारक राहणार आहे.

ऑटोरिक्षा मीटर तपासणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या माध्यमातून अलंकार पोलिस स्टेशनसमोर, कर्वेनगर, इऑन पार्क जवळ खराडी पोलिस चौकीसमोर तसेच दिवे येथे चाचणी मैदान येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी कळविली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अमरावती विमानतळावर दाखल

T20 Mumbai League: T20 मुंबई लीगमध्ये नवव्या टीमची भर; नवी मुंबईच्या खेळाडूंना आता मिळणार मोठी संधी

Banana Benefits: केळी खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते? जाणून घ्या

Ritu Tawade : मुंबईच्या महापौर रितू तावडेंना दणका, सत्र न्यायालयाने ठोठवला दंड

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा 15,200 रुपयांची स्वस्त; 18K- 22K आणि 24K चे दर किती?

SCROLL FOR NEXT