Pune Crime  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यात आणखी एक संतापजनक प्रकार; शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत केलं भयंकर कृत्य

रोहिदास गाडगे

पुणे : पुण्यातील वानवडी परिसरात दोन शाळकरी मुलींवर अत्याचाराची घटना ताजी अशताना आंबेगाव तालुक्यातही संपाजनक घटना उघडकीस आली आहे. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगावात शिक्षकीपेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. घोडेगावातील क्रीडा शिक्षकाने क्रिकेट खेळाडू विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील जनता विद्या मंदिर शाळेच्या क्रीडा शिक्षकाने एका क्रिकेट खेळाडू विद्यार्थिनीचा विनंयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून घोडेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेळाडू मुलीला क्रिकेट संघाचं कॅप्टन पद देण्याचं आमिष दाखवत जवळीक साधून शिक्षक राजेंद्र यांनी विद्यार्थिनीचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित मुलीने शिक्षकाचा त्रास सहन न झाल्याने क्रीडा शिक्षकाने तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांत पोहोचलं.

पुण्याच्या वानवडीत दोन मुलींवर अत्याचार

पुण्यातील वानवडीत दोन शाळकरी मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. स्कूल व्हॅनच्या चालकाने दोन शाळकरी मुलींवर अत्याचार केला आहे. या घटनेनंतर परिसरातील वातावरण तापलं आहे. स्कूल व्हॅन चालकाच्या संतापजनक कृत्यानंतर त्याला कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

वानवडी अत्याचार प्रकरणातील आरोपीला मिळाली ५ दिवसांची कोठडी

वानवडी अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपीला आज पुण्यातील पोस्को कोर्टात हजर केलं. कोर्टात हजर केल्यानंतर आरोपीला ८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टाने आरोपीला तब्बल ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी कोर्टाबाहेर मोठा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुण्यातही महिलांवर अत्याचार वाढू लागले आहेत. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळकरी मुलींवर वाढलेल्या अत्याचाराच्या प्रकारामुळे पालकांची चिंता वाढली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Classical Language Status : अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय? निर्णयाने काय होणार फायदा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Marathi News Live Updates : महायुतीत एकनाथ शिंदे १०० जागा लढवण्यावर ठाम?

Railway Employees Bonus 2024: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, केंद्राने बोनस केला जाहीर; मिळणार 'इतकी' रक्कम

Marathi Classical Language Status : जाहलो खरेच धन्य...! मराठी भाषेला अभिजात दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: शरद पवारांचा एकाच वेळी भाजप-अजित पवारांना धक्का, डाव टाकताच बडे नेते लागले गळाला!

SCROLL FOR NEXT