Pune Airport: धुक्यामुळे हवाई वाहतुकीला उशीर, अनेक फ्लाईट्सचा मार्ग बदलला... Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Airport: धुक्यामुळे हवाई वाहतुकीला उशीर, अनेक फ्लाईट्सचा मार्ग बदलला...

पुणे विमानतळ परिसरातही मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरली आहे, त्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने त्याचा परिणाम हवाई वाहतुकीवर झाला आहे.

वृत्तसंस्था

प्राची कुलकर्णी, पुणे

पुणे: राज्यात अवकाळी पावसामुळे वातारणात अचानक गारवा निर्माण झाला आहे. तापमानात कमालीची घट झाल्याने अनेक ठिकाणी धुक्याची (Fog) चादर पसरली आहे, याचा परिणाम सर्व प्रकारच्या वाहतुकींवर (Air Traffic) होत आहे. पुणे विमानतळ (Pune Airport) परिसरातही मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरली आहे, त्यामुळे दृश्यमानता (Visibility) कमी झाल्याने त्याचा परिणाम हवाई वाहतुकीवर झाला आहे. अनेक प्लाईट्सच्या (Flights) वेळा बदलण्यात आल्या असून काही फ्लाईट्स रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या फ्लाईट्सच्या वेळा आण अपडेट्स पुन्हा एकदा तपासून घ्याव्या असं आवाहन विमानतळ प्रशासनाने केलं आहे. (Pune Airport: Due to fog, air traffic was delayed, many flights were diverted)

हे देखील पहा -

शुक्रवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंत खालील उड्डाणे वळवण्यात आली आहेत:

१) 6E-699 - 0415 वाजता अहमदाबाद - पुणे, मुंबईकडे वळवले

२) 6E-2343 - 0430 वा दिल्ली - पुणे मुंबईकडे वळवले

३) 6E-201 - 0445 तास चेन्नई - पुणे हैदराबादला वळवले

४) AI 851 DEL- PUNE मुंबईकडे वळवले

एकुणच पाहता अवकाळी पावसाने शेतीसह सर्व प्रकारच्या वाहतुकींवरही परिणाम केला आहे. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांंचे मार्ग आणि विमानांचे मार्ग एकतर बदलण्यात आले आहे किंवा वळवण्यात आले आहेत.

(टीप: पुणे विमानतळाच्या प्लाईट्स अपडेट्ससाठी पुणे विमानतळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या अथवा ट्विटर पहा)

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT