मुंबई: कोडेन फॉस्फेट (codeine phosphate) या खोकल्याच्या औषधाच्या ३६०० बाटल्यांसह २३ वर्षीय तरुणाला अंमलीपदार्थ विरोधी कक्षाने (एएनसी) अटक केली आहे. मोहम्मद अर्शद मोहम्मद अक्रम शेख (२३) असे अटक आरोपीचे नाव आहे. डोंगरी (Dongri) परिसरात एक संशयीत अमलीपदार्थ मिश्रीत खोकल्याचे औषध (Cough medicine) घेऊन येणार असल्याची माहिती एएनसीला मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे त्यावेळी १२० औषधाच्या बाटल्या सापडल्या. (young man arrested with 3600 bottles of cough medicine)
हे देखील पहा -
पुढे त्याने दिलेल्या माहितीवरून मेमनवाडा परिसरात छापा टाकून आणखी ३४८० औषधाच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. हे औषध कोरेक्स (Corex DX Syrup) म्हणून प्रसिद्ध असून काही तरूण त्याचा अंमली पदार्थांसारखा (Drugs) वापर करतात. या औषधाच्या सेवनामुळे अति झोप येते, भूक लागत नाही. झोपडपट्टी, मध्यमवर्गीय तरूण मोठ्या प्रमाणात याच्या आहारी गेले आहेत.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.