pune news Saam tv
मुंबई/पुणे

Pune Accident : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये भीषण अपघात; दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

Pune Accident news : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये भीषण अपघात झालाय. या भीषण अपघातात दोन शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

गोपाळ मोटघरे

पुण्यात आयटी कर्मचाऱ्यांची बस फूटपाथवर गेल्याने भीषण अपघात.

अपघातात दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

अपघातात अंदाजे ५–६ जण जखमी, उपचार सुरू

अपघाताचे कारण अजून अस्पष्ट, पोलिस तपास सुरू

पुण्यात अपघाताची मालिका सुरू आहे. पुण्यातील नवले पुलानंतर आता हिंजवडी आयटी पार्कामध्ये भीषण अपघात झाला आहे. हिंजवडी पार्कात सोमवारी झालेल्या भीषण अपघातात दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कात झालेल्या भीषण अपघातात दोन शाळकरी मुले दगावले. आयटी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस थेट फुटपाथवर चढली. या बसने धडक दिल्याने फुटपाथवरील एक शाळकरी मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू झाला. या अपघातात एकूण ५ ते ६ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हिंजवडी पार्कातील अपघाताचे नेमकं कारण अद्याप समजेले नाही.

हिंजवडी पार्कात सोमवारी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. या भागात सायंकाळच्या सुमारास वर्दळ असते. या वर्दळीच्या वेळेत अपघात झाल्याने अनेकांची धावाधाव झाली. बसच्या अपघातामुळे प्रवासी आणि पादचारी लोक घाबरून गेले. अपघातानंतर पादचारी लोक जखमींच्या मदतीला पोहोचले. त्यांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळावर जमा झालेली बघ्घ्यांची गर्दी पांगवली. तर अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहनधारकांना तातडीने वाट मोकळी करून दिली. त्यामुळे अपघातानंतर काही वेळेत पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली . पुण्यातील या भीषण अपघाताने सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अपघातानंतर लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. लोकांनी बस चालकावर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणात बस चालकावर गुन्हा दाखल झाल्याचे माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आदित्य आणि राज ठाकरेंची भेट, नेमकी काय चर्चा झाली? VIDEO

बदलापुरात मोठा राडा; भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, कार्यालयही फोडलं, VIDEO

राजकारणातील मोठी घडामोड; शिंदे गटाची प्रकाश आंबेडकरांकडे मदतीसाठी हाक, नेमकं काय घडलं?

हातातला नायलॉन मांजा गळ्यापर्यंत! दोर पतंगाची कापायची की आयुष्याची?

डोंबिवलीत 'महायुती'त रक्ताचा सडा, पैसे वाटपावरून भाजप- शिंदेसेनेत राडा

SCROLL FOR NEXT