PUNE TRAGIC DROWNING INCIDENT IN MAVAL: THREE YOUTHS DIE IN JADHAVWADI DAM Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : धरणात पोहोण्याचा मोह! जाधववाडी धरणात बुडून तिघांचा मृत्यू , पुण्यात खळबळ

Pune Maval News : मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात पोहायला गेलेल्या सहा तरुणांपैकी तिघांचा बुडून मृत्यू. पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने दुर्घटना; तिघांना वाचवण्यात यश.

Alisha Khedekar

  • मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात दुर्दैवी घटना

  • सहा तरुणांपैकी तिघांचा बुडून मृत्यू

  • तिघांना स्थानिकांच्या मदतीने वाचवण्यात यश

  • NDRF आणि बचाव पथकांचे तातडीने ऑपरेशन

  • पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दुर्घटना

गोपाळ मोटघरे,मावळ

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात रविवारी दुपारच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली आहे. जाधववाडी धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या सहा जणांपैकी तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पाण्याची खोली आणि प्रवाह याचा अचूक अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे एमआयडीसी परिसरातील जाधववाडी येथे सदर घटना घडली आहे. नवलाख उंब्रे येथे फिरण्यासाठी आलेल्या सहा तरुणांचा ग्रुप हा दुपारी जाधववाडी धरणाजवळ पोहोचला. काही वेळ परिसरात वेळ घालवल्यानंतर त्यांनी पाण्यात उतरून पोहण्यास सुरुवात केली. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते, मात्र धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यापैकी तिघे जण पाण्यात बुडाले, तर उर्वरित तिघांना स्थानिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आलं.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, NDRF पथक तसेच तळेगाव दाभाडे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करत पाण्यात बुडालेल्या तिघांचा शोध घेतला आणि त्यांना बाहेर काढले. जखमी अवस्थेत सापडलेल्या तरुणांना त्वरित ‘विरा ॲम्बुलन्स सर्विस’च्या माध्यमातून तळेगाव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर अजय गारुडे, अनिकेत पवार आणि संतोष एडके यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उष्णतेच्या दिवसांत धरण, तलाव किंवा नदीकाठी फिरण्यासाठी जाणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. धरण किंवा तलावांमध्ये पोहताना पाण्याची खोली, प्रवाह आणि सुरक्षितता याचा अंदाज घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एक छोटा चुकीचा अंदाजही जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे अशा ठिकाणी पोहणे टाळावे किंवा आवश्यक ती खबरदारी घेऊनच पाण्यात उतरावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भरधाव कार ५०० मीटर खोल दरीत कोसळली; एकाच कुंटुबातील ४ जणांचा मृत्यू

Police Officer Transfer: महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; ३४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

SRPF भरती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट; पेपर फुटीचा मुख्य आरोपी आला समोर

Accident: पालघरमध्ये अपघाताचा थरार, २ दुचाकींची समोरासमोर धडक; २ जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर

Bribe Case: मुंबईतील ज्युनियर कॉलेजच्या मंजुरीसाठी मागितली दीड लाखांची लाच; लिपिकाला ठोकल्या बेड्या, शिक्षण विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT