Pune Solapur Expressway Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident : क्षणात होत्याचं नव्हतं झालं! पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

Pune Solapur Expressway Accident News : पुणे सोलापूर महामार्गावर स्कोर्पिओचा भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. उरुळी कांचन पोलीस तपास करत आहेत.

Alisha Khedekar

  • पुणे-सोलापूर महामार्गावर पहाटे भीषण अपघात

  • स्कोर्पिओ झाडावर आदळून वाहनाचा चक्काचूर

  • गौरख माने यांचा उपचारादरम्यान मृत्यू

  • तिघेजण गंभीर जखमी; पोलीस तपास सुरू

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुणे सोलापूर महामार्गावर स्कोर्पिओ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. शिवाय स्कोर्पिओ कारचा देखील चक्काचूर झाला आहे. सदर घटना कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती परिसरात घडली आहे. गौरख त्र्यंबक माने असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर समाधान अंकुश बाबर, विजय सूर्यकांत माने, अलिकेश खान असे अपघातात जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास समाधान बाबर यांचे मामा विजय माने, चुलत मामा गौरख माने व त्यांचे मित्र अलिकेश खान असे चौघेजण मुंबई येथे कामानिमित्त गेले होते. काम झाल्यानंतर हे चौघेही गुरुवारी संध्याकाळी मुंबई येथून रात्री करमाळ्याकडे निघाले होते. दरम्यान हडपसर पुणे येथे सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आले, नंतर विजय माने हे स्कार्पिओ चालवण्यास बसले होते. तर त्यांच्या शेजारील सीटवर गौरख माने हे बसले होते. तर पाठीमागील सीटवर समाधान बाबर व विजय माने हे बसले होते.

उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रयागधाम फाटा व कोरेगाव मूळ जवळ आले असता विजय माने यांचा स्कोर्पिओवरील ताबा सुटला आणि स्कार्पिओ कार ही हायवेवरून खाली उतरून झाडाला धडकली. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले तर, गौरख माने यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली.

सदर घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार उद्धव गायकवाड, हरिष शितोळे, अमोल राऊत, बाळू चोरमले घटनास्थळी दाखल झाले. तसेच सर्व जखमींना कस्तुरी रुग्णवाहिकेचे माऊली लाड, संतोष झोंबाडे, रतन चव्हाण यांनी नागरिकांच्या मदतीने उरुळी कांचन येथील सिद्धीविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचारादरम्यान गौरख माने यांचा मृत्यू झाला तर इतर तीन जणांवर उपचार सुरु आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माणगावमध्ये सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता

आई-वडिलांमधील तडजोडीमुळे मुलीचा पोटगीचा हक्क संपत नाही; मुंबई कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, वाचा नेमकं काय घडलं?

Beed : बोगस खेळाडूंचे रॅकेट उघडकीस आणणाऱ्या वैभवचा मृतदेह आढळला, बीडमधील धक्कादायक घटना

Shocking : नवी मुंबई हादरली! रात्री दोन तरुणींवर गोळीबार; परिसरात खळबळ

दिवाळीत भयंकर अपघात, ७ जणांचा मृत्यू; स्कूटीच्या अपघातानंतर मदतीसाठी धावले अन् भरधाव ट्रकने जमावाला चिरडले

SCROLL FOR NEXT