ST Bus Accident  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Shivshahi Bus Accident: शिवशाही बसला विचित्र अपघात, बसचं मोठं नुकसान

Pune Accident News : सकाळी संगमवाडीच्या बाळासाहेब ठाकरे चौकात ही घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune Accident News : पुण्यात शिवशाही बसचा विचित्र अपघात समोर आला आहे. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला आहे. बसमध्ये एकूण 25 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप आहेत. आज सकाळी संगमवाडीच्या बाळासाहेब ठाकरे चौकात हा अपघात झाला आहे.

एसटीच्या शिवशाही बसचा ब्रेक फेल झाल्यानंतर थेट फुटपाथवर चढून बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. बसचं या धडकेत मोठं नुकसान झालं आहे तर झाड देखील कोसळलं आहे.

एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास, असं म्हटलं जातं. मात्र खरंच एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास राहिलाय का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ मध्ये शिवशाहीचे सुमारे २२१ अपघात झाले. त्याआधीच्या वर्षी ही संख्या २४० होती. सध्या एसटीच्या ताफ्यात मालकीच्या ९०० बस आणि भाडेतत्वावरील ४०० बस आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

इराणचा इस्त्रायलवर मिसाईल हल्ला; आखाती युद्ध पुन्हा भडकणार?

cockroach janata party : भेटूया पुण्यात, जय महाराष्ट्र! अभिजीत दीपकेची घोषणा; कॉकरोच जनता पार्टी करणार पुण्यात आंदोलन

Maharashtra News Live Update: मिरजगाव परिसरात मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार? उद्धव ठाकरेंसोबत शिवतीर्थावर चर्चा?

SCROLL FOR NEXT