Pune Accident News Saam Digital
मुंबई/पुणे

Pune Accident News: ट्रकने कारला दीड किलोमीटर नेले फरफटत; शिवशाही बससह पाच वाहनांना दिली धडक

Pune Accident News: पुण्यात मुंबई बेगळुरू महामार्गावर आज प्रवाशांना विचित्र अपघाताचा अनुभव आला. पुण्यातील भूमकर पुलावर साडेपाच शनिवारी पाच वाजण्याच्या सुमारास पाच वाहनांना ट्रकने धडक दिली.

Sandeep Gawade

Pune Accident News

पुण्यात मुंबई बेगळुरू महामार्गावर आज प्रवाशांना विचित्र अपघाताचा अनुभव आला. पुण्यातील भूमकर पुलावर साडेपाच शनिवारी पाच वाजण्याच्या सुमारास पाच वाहनांना ट्रकने धडक दिली. तर एका कारला तब्बल दीड किलो मीटर फरपटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात चार जण जखमी असून त्यांना जवळील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई बेगळुरू महामार्गावर पुण्यातील भूमकर पुलावर एका ट्रकने एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला धडक दिली. त्यांनतर एक पिकप, रेनॉल्ट कंपनीच्या एका कारला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यानंतर ट्रक चालकाने बाजूने जात असलेल्या एका कारला ट्रकच्या समोरील बाजू धडक दिली आणि या कारला जवळपास दीड किलोमीटर फरपटत नेले. यादरम्यान महामार्गावरची वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघात मोठी जीवितहानी टळली असली तरी चार जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी अपघातस्थळी दाखल होऊन पाहणी केली. तसेच या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : भात खाऊनही वजन होईल कमी, वाचा 'ही' पुलावची हेल्दी रेसिपी

Maharashtra News Live Update: पत्रकाराची गळफास घेऊन आत्महत्या

IPL 2026 : KKR च्या युवा फलंदाजावर बीसीसीआयची मोठी कारवाई, रागाच्या भरात केलेलं कृत्य भोवलं

पीडितेचं नाव बदललं, मलेशियाला पाठवण्याचा डाव, TCS धर्मांतर प्रकरणाचं मालेगाव कनेक्शन आलं समोर

Bhau Kadam: एकांकिकेत काम करणाऱ्या मुलीची बहिण आवडली, हटके स्टाईल केलं प्रपोज; भाऊ कदमची फिल्मी लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT