Tragic Accident in Pimpri-Chinchwad Saam
मुंबई/पुणे

गरोदर बहिणीसोबत रस्ता पार करत होती, भरधाव PMPML बसने उडवलं, ९ वर्षीय मुलीचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

Tragic Accident in Pimpri-Chinchwad: भरधाव वेगाने जाणाऱ्या पीएमपीएल बसने दोन बहिणींना उडवलं. एकीचा जागीच मृत्यू. दुसरी गरोदर महिला गंभीर जखमी. पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ.

Bhagyashree Kamble

गोपाल मोटघरे, साम टिव्ही

पुण्यातील पिंपरी चिंचवड येथून भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे. पीएमपीएमएल बसने दोन बहिणींना उडवलं. या अपघातात एका बहिणीला बसनं चिरडले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर, दुसरी बहीण गरोदर असून, ती गंभीररित्या जखमी झालेली आहे. तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

तळवडे-निगडी रस्त्यावर तळवडे चौकाजवळ मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला असल्याची माहिती आहे. सुधा बिहारीलाल वर्मा (वय वर्ष ९) असे मृत मुलीचे नाव आहे. तर, राधा राममनोज वर्मा असे गंभीर जखमी असलेल्या महिलेचं नाव आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमुळे ही घटना झाली असून, चालक किरण भटू पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राधा आणि तिचा पती तळवडे येथील खासगी कंपनीत कामाला आहेत. ती गरोदर असल्याने मदतीसाठी दोन महिन्यांपूर्वी लहान बहीण सुधा हिला गावाकडून बोलावून घेतले. बहिणींसोबत त्यांचा भाऊही राहतो. तो खासगी कामात कार्यरत आहे. रात्रपाळी करून आल्यानंतर राधाचा पती मंगळवारी घरी झोपला होता.

तर राधा कामावर गेली होती. दुपारी एकच्या सुमारास ती घरी आली. जेवण करून सुधालासोबत घेऊन राधा पायी चालत कंपनीत परत कामावर जात होती. रस्ता ओलांडत असताना भरधाव बसने त्यांना धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने सुधाचा मृत्यू झाला, तर राधा गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांचा पुढील तपास सुरू असून, वर्मा कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नात हुंडा मिळाला नाही; नवऱ्याचं डोकं फिरलं, बायकोसोबतच्या खासगी क्षणाचे व्हिडिओ केले व्हायरल

Maharashtra Live News Update: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी मोठी अपडेट, २ पोलिसांचे निलंबन

Viral Video : हात जोडले, आरती ओवाळली; फुटपाथवरून दुचाकी घेऊन जाणाऱ्या तरुणासोबत महिलेने काय केलं पाहा। VIDEO

Kidney damage symptoms: सकाळी अंथरूणातून उठताच ही लक्षणं दिसली तर समजा किडनी खराब झालीये; 99% लोकं करतायत दुर्लक्ष

अधिवेशनात बिबट्याच्या वेशात आला आमदार! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT