Pune Accident News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Accident News: वरंध घाटात कार ९० फूट खोल दरीत कोसळली; दैव चांगले म्हणून तिघे बचावले

Pune News : वरंध घाटात कार ९० फूट खोल दरीत कोसळली; दैव चांगले म्हणून तिघे बचावले

Rajesh Sonwane

सचिन जाधव
पुणे : पुण्याहून महाडला जाणाऱ्या मार्गावर वरंध घाटात कार ९० फूट खोल दरीत गेल्याची घटना घडली (Pune) आहे. गाडीतून धूर निघत असल्यानं गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून तिघे प्रवासी गाडीतून खाली (Accident) उतरले असताना गाडी दरीत कोसळली. (Maharashtra News)

पुण्याहून महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंध घाटात उंबर्डे गावाच्या हद्दीत हि घटना घडली आहे. गाडी पुण्याहून महाडच्या दिशेने जात असताना उंबर्डे गावाजवळ गाडीतून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली. यानंतर गाडीत काय बिघाड झाला हे तपासणी करण्यासाठी तिघे प्रवासी गाडीतून खाली उतरले.

सुदैवाने तिघे बचावले 

हँडब्रेक लावला नसल्याने गाडी उताराने जाऊन अचानक दरीत कोसळली. सुदैवाने गाडीत कुणी नसल्याने यात कुणीही जखमी झालं नाही. मात्र यात गाडीचं मोठं नुकसान झालंयं. घाटामध्ये अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला संरक्षक कठडे नसल्यानं वारंवार गाडी दरीत कोसळत असल्याच्या घटना घडत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Internal Rift: काँग्रेसमध्ये चाललंय काय? माजी आमदारासह तब्बल २९ नेत्यांना धडाधड आल्या नोटीस, नेमकं प्रकरण आहे काय?

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT