Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

Nandurbar News: बाजार समितीत पहिल्याच दिवशी २०० क्विंटल कापूस खरेदी; प्रतिक्विंटल ७२०० पर्यंत भाव

Nandurbar News : बाजार समितीत पहिल्याच दिवशी २०० क्विंटल कापूस खरेदी; प्रतिक्विंटल ७२०० पर्यंत भाव
Published on

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रावर खाजगी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. या (Cotton) कापूस खरेदीला शेतकऱ्यांचा चांगला (Nandurbar) प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. बाजार समितीत कापसाला ६७०० ते ७२०० पर्यंत दर मिळत असून मागील वर्षाच्या तुलनेत हा दर १७०० ते २ हजार रुपयांनी कमी आहे. (Latest Marathi News)

Nandurbar News
Swabhimani Shetkari Sanghatana : 'स्वाभिमानी'ची ट्रकवर दगडफेक, साखरेची वाहतूक राेखली

शासनाच्या हमीभाव केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना (farmer) हमीभावापेक्षा कमी दरात कापूस विकावा लागत असल्याचे चित्र आहे. बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्राला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्या दिवशी दोनशे क्विंटल कापसाची खरेदी झाली असून कापसाचे आवक वाढण्याची शक्यता बाजार समितीच्या वतीने व्यक्त केली जात आहे. 

Nandurbar News
Sambhajinagar News: अडीच महिन्यांपासून नाही पाणी; महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

दुसरीकडे लाल्या रोग आणि दुष्काळी परिस्थितीमुळे कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट आल्याने कापसाचे भाव वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तरी शेतकऱ्यांनी आता दिवाळी आणि (Cotton Price) दसरा या सणांच्या पार्श्वभूमीवर कापूस विक्रीला सुरुवात केली आहे. शासनाच्या सरकारी कापूस खरेदी केंद्र कधी सुरू होतील याची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांना लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com